आईने जीवाची बाजी लावून पोरीला वाचवलं, ४ वर्षाच्या चिमुकलीच्या अपहरणाचा डाव फसला
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 22, 2020 20:04 IST2020-07-22T20:03:11+5:302020-07-22T20:04:08+5:30
चिमुकलीने जोरजोरात आरडाओरडा केल्याने सार्वजनिक ठिकाणी रस्त्यावरच लोकांनी 2 अपहरणकर्त्यांना पकडण्यासाठी खूप प्रयत्न केले, पण अपहरणकर्ते शस्त्राचा धाक दाखवून पळून गेले.

आईने जीवाची बाजी लावून पोरीला वाचवलं, ४ वर्षाच्या चिमुकलीच्या अपहरणाचा डाव फसला
पूर्व दिल्लीच्या शकरपूरमध्ये धक्कादायक सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहेत. सीसीटीव्हीमध्ये दुचाकीवरुन जाणाऱ्या 2 अपहरणकर्ते एका 4 वर्षाच्या मुलीचं अपहरण करण्याचा प्रयत्न करीत आहेत. चिमुकलीने जोरजोरात आरडाओरडा केल्याने सार्वजनिक ठिकाणी रस्त्यावरच लोकांनी 2 अपहरणकर्त्यांना पकडण्यासाठी खूप प्रयत्न केले, पण अपहरणकर्ते शस्त्राचा धाक दाखवून पळून गेले.
ही घटना मंगळवारी दुपारी चार वाजण्याच्या सुमारास घडली आहे. शकरपूर परिसरातील सुंदर ब्लॉकमध्ये पाऊस पडल्यानंतर एक 4 वर्षाची मुलगी घराबाहेर खेळत होती, तर काळ्या दुचाकीवरून आलेल्या 2 अपहरणकर्त्यांनी मुलीचे अपहरण करण्याचा प्रयत्न केला. मुलीच्या आईने प्रथम मुलीला त्यांच्याकडून हिसकावून घेतले आणि मग शेजारी त्यांच्यामागे धावत गेले. त्यांनी अपहरणकर्त्यांना पकडण्याचा प्रयत्न केला. मात्र, दुचाकीवरून पळ काढत असताना एकाने आपली स्कूटी रस्त्याच्या मध्यभागी ठेवली. अपहरणकर्ते रस्त्यात पडले आणि त्यांनी दुचाकी सोडून पळ काढला.
अन्य महत्वाच्या बातम्या...
मेट्रो सिटीत IS ची कमान महिलांच्या हाती; NIAचा मोठा खुलासा
Vikas Dubey Encounter : कुख्यात गँगस्टर विकास दुबेचा पोस्टमॉर्टेम रिपोर्ट आला समोर, झाला मोठा खुलासा
दहा रुपये, समोसा अन् घडली भयावह घटना; शाळकरी मुलाने गळफास लावून केली आत्महत्या
वेदनादायी! शेतात घुसली म्हणून सांडणीचे कुऱ्हाडीनं कापले पाय; तडफडत सोडला जीव
वकिलांना लोकलने प्रवास करण्याची परवानगी देऊ शकत नाही, राज्य सरकारची उच्च न्यायालयाला माहिती
...अन् फेसबुक फ्रेंडनं महिलेला घातला थोडा थोडका नव्हे, तर ११ लाखांचा गंडा
मनोरुग्ण तरुणीवर कारमध्ये अत्याचार; विवस्त्रवस्थेत आढळून आली पीडित तरुणी
कुलभूषण जाधव प्रकरणात पाकिस्तानची नवीच शक्कल; हायकोर्टाकडून वकील देण्याची मागणी