शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

आईने उशीने तोंड दाबून मुलाचा घेतला जीव अन् स्वतःही घेतला गळफास लावून

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 10, 2021 16:38 IST

Murder And Suicide Case : मुलगा ऑनलाईन अभ्यास करत नसल्याने आईने त्याची हत्या केली. नंतर स्वत: देखील आत्महत्या केल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.

ठळक मुद्देशिखा सागर पाठक (३२) यांनी सोमवारी त्यांच्या राहत्या घरात आई-वडील हॉलमध्ये बसलेले असताना बेडरुमचा दरवाजा बंद करून गळफास घेऊन आत्महत्या केली. मृतदेहाजवळ ही सुसाईड नोट आढळून आली आहे. या सुसाईड नोटमध्ये माझ्या मृत्यूला कोणालाही जबाबदार धरु नये, असं मृतक महिलेने लिहिलं आहे.

नाशिक : मुलगा ऑनलाइन अभ्यास करत नसल्याचा राग अनावर झाल्याने आईने उशीने तोंड दाबून मुलाचा खून केला. नंतर स्वतःही घेतला गळफास लावून आत्महत्या केली.  रिधान सागर पाठक असे खून झालेल्या मुलाचे नाव आहे तर शिखा सागर पाठक (३०, रा. साईसिद्धी अपार्टमेंट,पाथर्डी फाटा, नाशिक) असे मयत संशयित आरोपी असलेल्याआईचे नाव आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार शिखा पाठक यांनी सोमवारी (दि. ९) सायंकाळी पाच वाजता त्यांचे आई-वडील घरातील हॉलमध्ये बसलेले असताना बेडरूमचा दरवाजा आतून बंद करून घेतला. मुलगा रिधान याने अभ्यास करावा, हुशार व्हावे, यासाठी ती सतत त्याला बाेलत असत. साेमवारी तिने रिधान अभ्यास करत नाही, म्हणूण त्याच्या नाकाताेंडावर उशी दाबून हत्या केली. श्वास बंद झाल्याने रिधानच्या नाकातून रक्त येऊन ताे बेडवर निपचित पडला. यानंतर शिखा हिने स्वत:ला गळफास लावून घेत आत्महत्या केली. मुलगी आणि नातू घरातून बाहेर येत नाही म्हणून तिच्या आई वडिलांनी आरडाओरड करुन दार जोरजोरात वाजवायला सुरुवात केली. मात्र शेवटी जावयाच्या मदतीने दार ताेडले असता दाेघे मृतावस्थेत आढळले. घटनेची माहिती मिळताच इंदिरानगर पाेलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नीलेश माईनकर, सहाय्यक पाेलिस आयुक्त सोहेल शेख घटनास्थळी दाखल झाले. दरम्यान, मृतदेहाजवळ सुसाईड नोट आढळून आली आहे. कुणाचीही तक्रार नसल्याने व तिच्या मृत्यूपूर्व चिठ्ठीत कोणाविरुद्ध तक्रार आढळलेली नसल्याने तसेच प्रत्यक्ष ठिकाणावरील परिस्थितीनुसार शिखाने मुलाची हत्या करुन नंतर आत्महत्या केल्याचे निष्पन्न हाेत आहे. त्यानुसार तिच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आल्याचे माईनकर यांनी सांगितले.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शिखा सागर पाठक (३२) यांनी सोमवारी त्यांच्या राहत्या घरात आई-वडील हॉलमध्ये बसलेले असताना बेडरुमचा दरवाजा बंद करून गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्या करण्यापूर्वी मुलगा रिधानचा उशीने तोंड दाबून खून केला असल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. 

मुलगा ऑनलाईन अभ्यास करत नसल्याने आईने त्याची हत्या केली. नंतर स्वत: देखील आत्महत्या केल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. घटनास्थळी सुसाईड नोट सापडली आहे. मृतदेहाजवळ ही सुसाईड नोट आढळून आली आहे. या सुसाईड नोटमध्ये माझ्या मृत्यूला कोणालाही जबाबदार धरु नये, असं मृतक महिलेने लिहिलं आहे. पोलिसांनी दोन्ही मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठविले आहे. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसNashikनाशिकDeathमृत्यूonlineऑनलाइन