आई की वैरीण? चिमुकल्याच्या तोंडात कापडाचा बोळा कोंडला, डोळ्याला पट्टी बांधली अन जिवंत जाळले!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 25, 2026 11:38 IST2026-02-25T11:35:50+5:302026-02-25T11:38:18+5:30

आईने आपल्या २ महिन्यांच्या चिमुकल्याचा बळी घेतल्याची धक्कादायक घटना हैदराबादमधील बोवरामपेट भागात घडली आहे.

Mother or enemy? A piece of cloth was stuffed into a child's mouth, blindfolded, and burned alive! | आई की वैरीण? चिमुकल्याच्या तोंडात कापडाचा बोळा कोंडला, डोळ्याला पट्टी बांधली अन जिवंत जाळले!

आई की वैरीण? चिमुकल्याच्या तोंडात कापडाचा बोळा कोंडला, डोळ्याला पट्टी बांधली अन जिवंत जाळले!

ज्या आईच्या कुशीत बाळ स्वतःला सुरक्षित समजतं, त्याच आईने यमदूत बनून आपल्या २ महिन्यांच्या चिमुकल्याचा बळी घेतल्याची धक्कादायक घटना हैदराबादमधील बोवरामपेट भागात घडली आहे. सतत रडणाऱ्या बाळाला शांत करण्याऐवजी, रागाच्या भरात या मातेने त्याला जळत्या चुलीत फेकून जिवंत जाळले. या क्रूर घटनेमुळे संपूर्ण तेलंगणा राज्य हादरले असून परिसरात संताप व्यक्त केला जात आहे.

पित्याने पाहिला काळजाचा थरकाप उडवणारा प्रसंग

ही हृदयद्रावक घटना तेव्हा उघडकीस आली, जेव्हा बाळाचा पिता राजेंद्र हा सकाळी कामावरून घरी परतला. घरात शिरताच समोरचं दृश्य पाहून त्याच्या पायाखालची जमीनच सरकली. त्याची पत्नी ममता ही स्वतःच्याच बाळाला चुलीतील आगीत जाळत होती. बाळाच्या किंकाळ्या बाहेर जाऊ नयेत म्हणून या पाषाणहृदयी महिलेने चिमुकल्याच्या तोंडात कापडाचा बोळा कोंडला होता आणि डोळ्यांवर पट्टी बांधली होती. राजेंद्रने तात्काळ धाव घेतली, पण तोपर्यंत उशीर झाला होता; त्या निष्पाप जीवाने जगाचा निरोप घेतला होता.

मजुरी करून उदरनिर्वाह करणारे कुटुंब

मूळचे मध्य प्रदेशचे असलेले ममता आणि राजेंद्र हे दाम्पत्य उदरनिर्वाहासाठी हैदराबादमध्ये आले होते. बोवरामपेट येथील एका अपार्टमेंटमध्ये ते रखवालदार आणि मजुरीचे काम करत होते. मंगळवारी दुपारी १२ च्या सुमारास ही घटना घडली. माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले, तेव्हा बाळाचा मृतदेह अत्यंत छिन्नविछिन्न अवस्थेत आढळला. हे दृश्य पाहून उपस्थितांच्याही डोळ्यांत पाणी आले.

मानसिक तणाव की पोस्टपार्टम डिप्रेशन?

पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सर्व बाजूंनी सुरू केला आहे. प्राथमिक चौकशीत असे समोर आले आहे की, बाळ बराच वेळ रडत असल्यामुळे ममताने मानसिक संतुलन गमावले आणि हे टोकाचे पाऊल उचलले. पोलीस आता 'पोस्टपार्टम डिप्रेशन' अर्थात बाळंतपणानंतर येणारा मानसिक तणाव या कोनातूनही तपास करत आहेत. बाळाची देखभाल करताना तिला कोणाचीही मदत मिळत नव्हती का? किंवा ती कोणत्या मानसिक व्याधीने त्रस्त होती का? याचा शोध घेतला जात आहे.

आरोपी माता पोलिसांच्या ताब्यात

सायबराबाद पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करून आरोपी माता ममता हिला ताब्यात घेतले आहे. बाळाचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. "ही एक अत्यंत संवेदनशील आणि क्रूर घटना आहे. आम्ही या प्रकरणाचा सखोल तपास करत आहोत," असे पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले.

Web Title : हैदराबाद: माँ ने 2 महीने के बच्चे को आग में फेंककर मार डाला

Web Summary : हैदराबाद में एक माँ ने अपने 2 महीने के बच्चे को आग में फेंककर क्रूरता से मार डाला। पिता ने इस भयानक कृत्य को देखा। पुलिस प्रसवोत्तर अवसाद को संभावित मकसद मानकर जांच कर रही है। माँ हिरासत में है।

Web Title : Mother Kills 2-Month-Old Baby in Hyderabad, Throws into Fire

Web Summary : In Hyderabad, a mother horrifically murdered her 2-month-old by throwing him into a fire. The father witnessed the gruesome act. Police are investigating postpartum depression as a possible motive. The mother is in custody.