शहरं
Join us  
Trending Stories
1
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
2
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
3
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
4
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
5
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
6
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
7
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
8
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
9
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
10
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
11
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
12
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
13
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
14
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
15
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
16
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
17
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
18
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
19
इराणकडून आखाती देशांच्या तोंडचं पाणी पळवण्याची तयारी, पाणी आणि गॅस प्रकल्पांवर हल्ले, नव्या चालीमुळे खळबळ
20
SIP की एकरकमी गुंतवणूक? १ कोटींचा टप्पा गाठण्यासाठी सर्वात सोपा मार्ग कोणता? पाहा गणित
Daily Top 2Weekly Top 5

दोन मुलांची आई १७ वर्षांच्या तरुणाच्या प्रेमात पडली, वर्ष झालं पिच्छा सोडेना, अखेर तरुणाने 'असा' शिकवला धडा! 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 12, 2025 12:40 IST

एका घटस्फोटित महिलेने अल्पवयीन मुलाला वर्षभर त्रास दिला आणि त्याला लग्नासाठी धमकवायला सुरुवात केली. आकर्षणाच्या आहारी गेलेल्या या प्रेमाचा अखेर भयानक शेवट झाला आहे.

प्रेम आंधळं असतं म्हणतात, पण कधीकधी ते इतकं विकृत रूप धारण करतं की समाजही हादरून जातो. मध्य प्रदेशातील रतलाममध्ये अशीच एक धक्कादायक घटना समोर आली आहे, जिथे एका घटस्फोटित महिलेने अल्पवयीन मुलाला वर्षभर त्रास दिला आणि त्याला लग्नासाठी धमकवायला सुरुवात केली. आकर्षणाच्या आहारी गेलेल्या या प्रेमाचा अखेर भयानक शेवट झाला आहे. पीडित मुलाने धाडस करून पोलिसांकडे तक्रार दाखल केल्यानंतर त्या महिलेला बेड्या ठोकण्यात आल्या आहेत.

हाट की चौकी पोलीस स्टेशन हद्दीतील हे प्रकरण ऐकून अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. आरोपी महिला घटस्फोटित असून तिला स्वतःची १४ वर्षांची मुलगी आणि ९ वर्षांचा मुलगा आहे. तरीही, या महिलेने आपल्या वासनेपोटी १७ वर्षांच्या एका कोवळ्या मुलाला प्रचंड त्रास दिला. तब्बल वर्षभर तिने त्याच्यामागे लग्नासाठी तगादा लागला. इतकेच नाही तर त्याला लग्नासाठी वारंवार धमकावले. जर त्याने लग्नाला नकार दिला, तर त्याला खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकीही ती देत होती.

पोलिसांत धाव घेतली अन्... 

पीडित अल्पवयीन मुलगा आपल्या वडिलांसोबत पोलीस ठाण्यात पोहोचला आणि त्याने थरथरत्या आवाजात आपली आपबिती सांगितली. मुलाच्या वडिलांनी पोलिसांना सांगितले की, त्यांचा मुलगा दहावीत शिकत असून, ही घटस्फोटित महिला गेल्या एक वर्षापासून त्याच्या आयुष्यात विष कालवत होती. धक्कादायक बाब म्हणजे, या महिलेने यापूर्वी दोनदा लग्न केले असून, सध्या तिचा घटस्फोट झाला आहे. "ती माझ्या मुलाला वारंवार आपल्या घरी बोलावून त्याला धमकावत होती आणि तिच्याशी लग्न करण्यासाठी दबाव आणत होती," असे पीडित मुलाच्या वडिलांनी सांगितले.

महिलेला ठोकल्या बेड्या!

हाट पोलीस स्टेशनचे प्रभारी मुकेश सस्तिया यांनी या घटनेची गांभीर्याने दखल घेतली. तक्रार मिळताच, तात्काळ एफआयआर नोंदवण्यात आला आणि आरोपी महिलेला अटक करण्यात आली. मंगळवारी तिला न्यायालयात हजर करण्यात आले, जिथे न्यायालयाने तिला न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. या प्रकरणाचा सखोल तपास सुरू असून, आरोपी महिलेला तिच्या कृत्याची शिक्षा मिळणार हे निश्चित आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीMadhya Pradeshमध्य प्रदेश