टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 10, 2026 12:26 IST2026-04-10T12:25:06+5:302026-04-10T12:26:18+5:30

अलवरमध्ये एका महिलेने टॅक्सी ड्रायव्हर प्रियकरासह पतीच्या हत्येचा कट रचला. कॉल रेकॉर्डिंगमुळे बँक मॅनेजर पतीचा जीव वाचला.

Mother of two crazy in love with taxi driver; plot to murder bank manager husband foiled by 'that' call recording! | टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!

टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!

प्रेम आंधळं असतं असं म्हणतात, पण अलवरमध्ये एका महिलेचं प्रेम थेट गुन्हेगारीच्या वाटेवर गेल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. आपल्या टॅक्सी ड्रायव्हर प्रियकराच्या मदतीने एका विवाहित महिलेने आपल्याच बँक मॅनेजर पतीला संपवण्याचा कट रचला. मात्र, काळ आला होता पण वेळ आली नव्हती, या उक्तीप्रमाणे एका कॉल रेकॉर्डिंगमुळे पतीचा जीव थोडक्यात वाचला आहे. राजस्थानच्या अलवर जिल्ह्यातील गोविंदगड परिसरात ही खळबळजनक घटना घडली आहे.

टॅक्सी प्रवासातून जुळले सूत

अर्चना अरोरा हिचे लग्न २०१८ मध्ये कर्णव खत्री याच्याशी झाले होते. कर्णव जयपूरमधील एका खासगी बँकेत मॅनेजर पदावर कार्यरत असून त्यांना दोन मुले आहेत. पती नोकरीसाठी जयपूरला असल्याने अर्चना वारंवार टॅक्सीने त्याला भेटायला जात असे. याच प्रवासादरम्यान तिची ओळख टॅक्सी ड्रायव्हर ऋषभ शर्माशी झाली. ओळखीचे रूपांतर लवकरच प्रेमात झाले आणि दोघांनी पतीला वाटेतून बाजूला सारून एकत्र राहण्याचा भयानक कट रचला.

'तो' फोन कॉल अन् काळजाचा ठोका चुकला!

एके दिवशी कर्णव जयपूरहून टॅक्सीने आपल्या घरी परतत होता. योगायोगाने तो ऋषभच्याच टॅक्सीत होता. प्रवासात कर्णव मागच्या सीटवर झोपल्याचे नाटक करत होता. ऋषभला वाटले की कर्णव गाढ झोपला आहे. त्याने लगेच अर्चनाला फोन लावला आणि म्हणाला, "तुझा नवरा माझ्याच गाडीत आहे, तू सांगशील तर आजच त्याचा काटा काढतो", हे ऐकताच कर्णवच्या पायाखालची जमीन सरकली. त्याने मोठ्या धैर्याने मोबाईलवर हे संभाषण गुपचूप रेकॉर्ड केले.

५० लाखांची मागणी आणि फरार

या घटनेनंतर जेव्हा कर्णवने पत्नीला जाब विचारला, तेव्हा तिने उलट त्यालाच ब्लॅकमेल करण्यास सुरुवात केली. अर्चनाने घटस्फोटासाठी ५० लाख रुपयांची मागणी केली. पैसे देण्यास नकार दिल्याने अर्चना ७ सप्टेंबर २०२५ रोजी घरातील ५ लाख रुपये आणि दागिने घेऊन आपल्या लहान मुलासह प्रियकरासोबत पसार झाली.

महिन्याभराच्या लपंडावानंतर अटक

कर्णवने मार्च २०२६ मध्ये पोलिसांत तक्रार दाखल केली होती. तेव्हापासून पोलीस या दोघांच्या शोधात होते. अखेर महिनाभर फरार राहिल्यानंतर अर्चना आणि ऋषभ स्वतःच पोलीस अधीक्षकांना भेटण्यासाठी मिनी सचिवालय येथे पोहोचले. पोलिसांनी तत्काळ सापळा रचून दोघांना बेड्या ठोकल्या. सध्या न्यायालयाने अर्चनाची रवानगी जेलमध्ये केली असून ऋषभला पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

Web Title : टैक्सी ड्राइवर के साथ पत्नी ने रची पति की हत्या की साजिश, रिकॉर्डिंग से खुलासा

Web Summary : अलवर में एक महिला ने टैक्सी ड्राइवर प्रेमी के साथ मिलकर अपने बैंक मैनेजर पति की हत्या की साजिश रची। फोन रिकॉर्डिंग से साजिश का खुलासा हुआ, जिसके बाद एक महीने की फरारी के बाद दोनों गिरफ्तार।

Web Title : Wife plots husband's murder with taxi driver; recording foils plan.

Web Summary : Alwar woman planned to kill her banker husband with her taxi driver lover. A phone recording exposed their plot when the husband overheard their deadly conversation, leading to their arrest after a month-long escape.