प्रेमाच्या नादात नातंच विसरले! २ मुलांच्या आईने भाच्याशी केलं लग्न, नवऱ्याला पाठवले फोटो
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 7, 2025 17:41 IST2025-08-07T17:41:01+5:302025-08-07T17:41:41+5:30
शिवमची पत्नी पूनम तिच्या दोन्ही मुलांसह भाचा अंकितसह पळून गेली. त्यानंतर तिने अंकितशीही मंदिरात लग्न केलं.

फोटो - tv9hindi
बिहारमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. २ मुलांच्या आईने भाच्याशी लग्न केलं. यानंतर पतीने पोलिसांत धाव घेतली आहे. शिवम कुमार असं या पतीचं नाव असून तो बिहारमधील बांकाचा रहिवासी आहे. शिवमची पत्नी पूनम तिच्या दोन्ही मुलांसह भाचा अंकितसह पळून गेली. त्यानंतर तिने अंकितशीही मंदिरात लग्न केलं. इतकंच नाही तर पूनमने या लग्नाचा पुरावा म्हणून पतीच्या मोबाईलवर फोटो पाठवले.
आता शिवम कुमारने पोलिसांची मदत मागितली आहे. पोलीस सर्व बाजूंनी या प्रकरणाचा तपास करत आहेत आणि कायदेशीर कारवाईची प्रक्रिया सुरू आहे. हे प्रकरण अमरपूर पोलीस स्टेशन परिसरातील रघुनाथपूर गावातील आहे. पती शिवमने दिलेल्या माहितीनुसार, २०१४ मध्ये अमरपूर पोलीस स्टेशन परिसरातील दिघी पोखर येथील रहिवासी पूनम कुमारीशी लग्न झालं होतं. लग्नानंतर या जोडप्याला आकाश कुमार (१०) आणि ऋषी कुमार (८) ही दोन मुलं झाली.
पूनमचा भाचा अंकित कुमार हा भूरिया डायरा गावचा रहिवासी आहे, तो त्यांच्या घरी येऊ लागला. हळूहळू पूनम आणि अंकित यांच्यात प्रेमसंबंध निर्माण झाले. दोन दिवसांपूर्वी पूनम अचानक दोन्ही मुलांसह घरातून गायब झाली. त्यानंतर शिवम कुमारन त्यांचा शोध घेतला. पण काही वेळाने पूनम कुमारीने शिवमच्या मोबाईलवर फोटो पाठवला, ज्यामध्ये तिने एका मंदिरात अंकितशी लग्न केलेलं दिसत आहे.
शिवम कुमार म्हणाला की, अंकित हा पूनमचा भाचा आहे. पत्नीने केवळ त्याचा विश्वासघात केला नाही तर मुलांना सोबत घेऊन त्यांचा जीवही धोक्यात घातला आहे. शिवमन याप्रकरणी अमरपूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पोलीस या प्रकरणाची चौकशी करत आहेत. संपूर्ण परिसरात तसेच सोशल मीडियावर या लग्नाची खूप चर्चा होत आहे. कारण या लग्नाचे फोटो सोशल मीडियावरही व्हायरल झाले आहेत.