काळाचौकी बाळ चोरी प्रकरण: मुलगी झाली म्हणून आईनेच चिमुकलीची हत्या करून फेकले पाण्याच्या टाकीत, धक्कादायक माहिती आली समोर

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 3, 2021 07:07 IST2021-12-03T05:38:27+5:302021-12-03T07:07:19+5:30

Crime News: मुलगी नको म्हणून जन्मदात्या आईनेच साडेतीन महिन्याच्या बाळाची हत्या करून त्याला पाण्याच्या टाकीत फेकल्याची धक्कादायक माहिती काळाचौकी बाळचोरी प्रकरणातून उघडकीस आली आहे. अपहरण झाल्याच्या तक्रारीनंतर मुंबई पोलीस शोधासाठी अहोरात्र तपास करीत असताना उघड झालेल्या या माहितीने सर्वांनाच सुन्न केले आहे.

The mother killed baby Girl and threw her in a water tank as she gave birth to a baby girl | काळाचौकी बाळ चोरी प्रकरण: मुलगी झाली म्हणून आईनेच चिमुकलीची हत्या करून फेकले पाण्याच्या टाकीत, धक्कादायक माहिती आली समोर

काळाचौकी बाळ चोरी प्रकरण: मुलगी झाली म्हणून आईनेच चिमुकलीची हत्या करून फेकले पाण्याच्या टाकीत, धक्कादायक माहिती आली समोर

 मुंबई : मुलगी नको म्हणून जन्मदात्या आईनेच साडेतीन महिन्याच्या बाळाची हत्या करून त्याला पाण्याच्या टाकीत फेकल्याची धक्कादायक माहिती काळाचौकी बाळचोरी प्रकरणातून उघडकीस आली आहे. अपहरण झाल्याच्या तक्रारीनंतर मुंबई पोलीस शोधासाठी अहोरात्र तपास करीत असताना उघड झालेल्या या माहितीने सर्वांनाच सुन्न केले आहे.

फेरबंदर येथील संघर्ष सदन इमारतीत १५ दिवसांपूर्वीच मगदूम कुटुंबीय राहण्यास आले होते. बजरंग मगदूम हे कॅफेमध्ये नोकरी करतात, तर पत्नी सपना ही गृहिणी आहे. त्यांना दोन मुली आहेत. जुन्या मोबाइलवर बास्केट देण्याच्या बहाण्याने घरात शिरलेल्या महिलेने आपणास बेशुद्ध करत बाळ पळवून नेल्याचे सांगितल्याने खळबळ उडाली. साडेतीन महिन्याच्या वेदाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आणि प्रत्येक जण ती सुखरूप सापडावी यासाठी प्रार्थना करू लागला.

दुसरीकडे मुंबई पोलिसांसह, गुन्हे शाखा अहोरात्र मुलीच्या शोधासाठी प्रयत्न करत होती. सीसीटीव्ही फुटेजमधून काहीही माहिती हाती लागत नसल्याने पोलिसांनी तिच्या आईकडेच पुन्हा चौकशी सुरू केली. तिने दिलेल्या माहितीत तफावत आढळल्याने त्यांचा संशय बळावला. पथकाने त्यांना विश्वासात घेत चौकशी करताच सपना हिने आपणच मुलीची हत्या करून अपहरणाचा बनाव रचल्याची कबुली दिली आणि सर्वांनाच धक्का बसला आहे.

दुसरीही मुलगी झाली म्हणून सपना नाराज होती. मंगळवारी पती घरात असताना जुन्या मोबाइलवर बास्केट देण्यासाठी एक महिला आली होती. मात्र तिने मोठ्या मोबाइलची मागणी केल्याने ती महिला निघून गेली. त्यानंतर पती एका मुलीला सोबत घेऊन आईला डबा देण्यासाठी घराबाहेर पडला. याच दरम्यान घरात चिमुरडीसोबत एकट्या असलेल्या सपनाने मुलीच्या अपहरणाच्या बनावाचा कट रचला. घरातच बाळाची हत्या करून तिला इमारतीच्या पाण्याच्या टाकीत फेकले. त्यानंतर घरी येऊन बेशुद्ध होण्याचे नाटक केल्याचे तपासात उघडकीस आले.

काळाचौकी पोलिसांकडून सपना हिच्याकडे अधिक चौकशी सुरू आहे. यात आणखी कुणाचा सहभाग आहे का, याबाबत पथक अधिक तपास करत आहे.

Web Title: The mother killed baby Girl and threw her in a water tank as she gave birth to a baby girl