Mother in Law Fled with Son in Law: म्हणजे नक्की चाललंय काय असा प्रश्न तुम्हाला पडू शकतो. अशा घटना आता नात्यांमध्ये घडू लागल्या आहेत. काही दिवसांपूर्वी सासू होणाऱ्या जावयासोबत पळून गेल्याच्या प्रकरणाबद्दल तुम्ही ऐकलं, वाचलं असेल. त्या घटनेची चर्चा थांबत नाही, तोच आता अशीच एक घटना समोर आली आहे. ज्या मुलासोबत मुलीचं लग्न ठरलं, त्याच्यावरच सासूचा जीव जडला... नंतर जे घडलं, ते एखाद्या सिनेमाच्या पटकथेसारखंच आहे.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
सासू होणाऱ्या जावयासोबत पळून गेल्याची ही घटना घडली आहे, उत्तर प्रदेशमध्ये! दुबोलिया परिसरात असलेल्या एका गावातील मुलाचे चार महिन्यांपूर्वी गोंडा जिल्ह्यातील एका गावातील मुलीसोबत लग्न ठरलं होतं.
लग्न ठरल्यानंतर मुलगा आणि मुलीचं मोबाईलवरून दररोज बोलणं सुरू झालं. पण, अधून मधून सासूही जावयाशी बोलू लागली. पण, नंतर सासूचे कॉल वाढले. मुलासोबत होणारी सासू बोलतेय म्हणून कुटुंबीयांना सुरूवातीला काही शंका आली नाही.
महिला आणि होणाऱ्या जावयाच्या लव्हस्टोरीचं बिंग कसं फुटलं?
मुलीच्या आईचं आणि होणाऱ्या जावयाचे मोबाईलवरून बोलणे वाढले. मुलाच्या वागण्या बोलण्यातून वेगळंच काहीतरी वेगळंच सुरू असल्याची शंका मुलाच्या कुटुंबीयांना आली. त्यानंतर कुटुंबीयांनी चौकशी केली. त्यात कुटुंबीयांना कळलं की आपल्या मुलाचं होणाऱ्या सासूसोबतच सूत जुळलंय.
लग्न मोडलं पण...
झालं. हे प्रकरण समोर आल्यानंतर चांगलाच गोंधळ झाला. मुलीच्या घरच्यांनी होणारं लग्न मोडलं. त्यानंतर मुलीचं लग्न दुसऱ्या ठिकाणी ठरलं. मे मध्ये मुलीचं लग्न होणार होतं. तारीख ठरली, पण आता तीन दिवसापूर्वी मुलीची आई ज्या मुलासोबत लग्न मोडलं, त्याच्यासोबत पळून गेली.
कुटुंबीयांनी आधी सगळीकडे शोध घेतला. महिला कुठेच सापडली नाही. त्यानंतर पोलीस ठाण्यात धाव घेतली. पोलिसांनी तरुणाच्या घरी धाव घेतली, तर तोही फरार असल्याचे आढळून आले. आता पोलीस दोघांचाही शोध घेत आहेत. महिला आणि तरुणाचा शोध घेण्यासाठी पोलीस पथकं स्थापन करण्यात आली आहेत. मोबाईलच्या आधारे त्यांचा ठावठिकाणा शोधला जात आहे.