जावयाच्या घरी सासूची आत्महत्या, टेरेसवर जाऊन घेतला गळफास लावून
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 8, 2022 19:19 IST2022-02-08T19:19:14+5:302022-02-08T19:19:52+5:30
Suicide Case : मंगळवारी अपार्टमेंटच्या चाैथ्या मजल्यावरील टेरेसवर असलेल्या पाण्याच्या टाकीच्या अँगलला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी सकाळी ९ वाजण्यापूर्वी घडल्याचे समाेर आले.

जावयाच्या घरी सासूची आत्महत्या, टेरेसवर जाऊन घेतला गळफास लावून
लातूर : मुलीच्या प्रसूतीसाठी जावयाच्या घरी आलेल्या सासूने अपार्टमेंटच्या चाैथ्या मजल्यावरील टेरेसवर गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना लातूर शहरातील रामनगर परिसरात मंगळवारी सकाळी उघडकीस आली आहे. याबाबत शिवाजीनगर पाेलीस ठाण्यात नाेंद करण्यात आली आहे. अंतेश्वरी सूर्यकांत चिगळे असे मयत महिलेचे नाव आहे.
पाेलिसांनी सांगितले, अंतेश्वरी चिगळे (४५, रा. हाळणी, ता. अहमदपूर) यांची मुलगी लातुरातील रामनगर परिसरात एका अपार्टमेंटमध्ये राहते. दरम्यान, त्या मुलीच्या प्रसूतिसाठी गत महिनाभरापूर्वी आल्या हाेत्या. मंगळवारी अपार्टमेंटच्या चाैथ्या मजल्यावरील टेरेसवर असलेल्या पाण्याच्या टाकीच्या अँगलला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी सकाळी ९ वाजण्यापूर्वी घडल्याचे समाेर आले.
काेणत्या कारणासाठी आत्महत्या केली, हे मात्र समजू शकले नाही, असे पाेलीस हेड काॅन्स्टेबल अशाेकराव चाैगुले यांनी सांगितले. घटनास्थळी शिवाजीनगर पाेलीस ठाण्याचे पाेलीस निरीक्षक दिलीप डाेलारे यांच्यासह इतर पाेलीस कर्मचाऱ्यांनी भेट देऊन पंचानामा केला. याबाबत शिवाजीनगर पाेलीस ठाण्यात घटनेची नाेंद करण्यात आली आहे. अधिक तपास पाेहेकाॅ. अशाेकराव चाैगुले करीत आहेत.