अविवाहित तरुणाच्या प्रेमात पडली चार मुलांची आई, रात्री दोघेही होते एकाच खोलीत, नंतर....

By ऑनलाइन लोकमत | Published: September 28, 2021 02:59 PM2021-09-28T14:59:27+5:302021-09-28T15:00:04+5:30

Crime News: एका विवाहित महिलेवर प्रेम करणे एका अविवाहित तरुणाला चांगलेच महागात पडले. (Crime News) या विवाहित महिलेवर प्रेम करणाऱ्या तरुणाची ग्रामस्थांनी दोरीने बांधून धुलाई केली.

The mother of four Child fell in love with an unmarried young man, they were both in the same room at night | अविवाहित तरुणाच्या प्रेमात पडली चार मुलांची आई, रात्री दोघेही होते एकाच खोलीत, नंतर....

अविवाहित तरुणाच्या प्रेमात पडली चार मुलांची आई, रात्री दोघेही होते एकाच खोलीत, नंतर....

Next

रांची - झारखंडमधील साहिबगंज जिल्ह्यात जमावाचा क्रूर चेहरा दिसून आला आहे. एका विवाहित महिलेवर प्रेम करणे एका अविवाहित तरुणाला चांगलेच महागात पडले. (Crime News) या विवाहित महिलेवर प्रेम करणाऱ्या तरुणाची ग्रामस्थांनी दोरीने बांधून धुलाई केली. आता या घटनेचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. ही घटना साहिबगंजमधील राजमहल ठाणे क्षेत्रातील सरकंडाजवळच्या एका गावात घडली. (The mother of four Child fell in love with an unmarried young man, they were both in the same room at night )

मिळालेल्या माहितीनुसार चार मुलांची आई असलेली ही महिला एका अविवाहित तरुणाच्या प्रेमात पडली. दोघेही एकत्र बराच वेळ घालवू लागले होते. रविवारी रात्री या महिलेला सदर तरुण प्रियकरासोबत बंद खोलीमध्ये आपत्तीजनक स्थितीत काही जणांनी पाहिले. त्यानंतर ग्रामस्थांनी या तरुणाला पकडले. मग या तरुणाला ग्रामस्थांनी दोरीने बांधून घातले. तसेच त्याला बेदम मारहाण केली. धटवनास्थळावर जमलेल्या जमावाने या तरुणाला लाथा-बुक्क्यांनी तसेच दांडक्याने बेदम मारहाण केली. तसेच या तरुणासोबत असलेल्या महिलेलाही मारहाण केली. यादरम्यान, जमावामधील काही लोकांनी घटनेचा व्हिडीओ बनवून तो व्हायरल केला. या व्हिडीओमध्ये महिलेच्या प्रियकराला बांधलेले दिसत आहे. तर लोक सदर महिलेला शिविगाळ करत असल्याचे ऐकू येत आहे.

सदर महिला आणि तरुणामध्ये गेल्या तीन-चार वर्षांपासून प्रेमप्रकरण सुरू आहे. या घटनेची माहिती मिळाल्यावर ठाणा प्रभारी प्रणीत पटेल हे घटनास्थळी पोहोचले. त्यांनी या प्रेमी युगुलाला ग्रामस्थांच्या तावडीतून सोडवून पोलीस ठाण्यात आणले. चार मुलांची आई असलेली ही महिला या अविवाहित तरुणाच्या प्रेमात पडली होती. दरम्यान, ही घटना घडली तेव्हा या महिलेचा पती घरात नव्हता. संधी पाहून महिलेने तिचा प्रियकर असलेल्या या तरुणाला घरी बोलावले. या तरुणाला महिलेच्या घरात जाताना कुणीतरी पाहिले. तसेच याची माहिती आजूबाजूच्या लोकांना दिली. त्यानंतर ग्रामस्थांनी या प्रेमी युगुलाला पकडले आणि त्यांची धुलाई केली. 

Web Title: The mother of four Child fell in love with an unmarried young man, they were both in the same room at night

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app