शहरं
Join us  
Trending Stories
1
ही मराठी माणसांच्या नाही तर ठाकरे बंधूंच्या अस्तित्वाची लढाई; एकनाथ शिंदेंचा घणाघात
2
'स्वयंपाक, मुले जन्माला घालणे, हेच उत्तर भारतीय महिलांचे काम', DMK खासदाराचे वादग्रस्त वक्तव्य
3
"मला काहून पाडलं? मह्या तोंडाला फेस येतो... माणूस पाहायचा नाही, फक्त...!'; दानवेंचं विधान चर्चेत, नेमकं काय म्हणाले?
4
“‘टॉयलेट मॅनर्स’ आहेत, त्यांनीच स्लीपर वंदे भारत ट्रेनने प्रवास करावा”; रेल्वे अधिकाऱ्यांची पोस्ट चर्चेत
5
अपहरण झालेल्या चिमुकलीच्या सुटकेसाठी राप्ती सागर एक्स्प्रेस नॉन-स्टॉप २६० किमी धावली!
6
PADU Machine: "मुंबईमध्ये 'पाडू' मशीन सरसकट वापरले जाणार नाही, तर..."; राज ठाकरेंच्या संतापानंतर आयुक्त गगराणींचा खुलासा
7
उणे ४०% गुण घेणाऱ्यांनाही मिळणार अ‍ॅडमिशन; NEET PG कट-ऑफ कमी करण्याच्या निर्णयाने वाद
8
बिटकॉइनचा धमाका! ९६ हजार डॉलर्सचा टप्पा ओलांडून २ महिन्यांच्या उच्चांकावर; पुढे काय होईल?
9
टॅरिफचा हत्यार म्हणून वापर करणारे ट्रम्प आपल्याच देशात अडकले, पॉवेल यांच्यावरील तपास पडला भारी
10
Instagram : रील स्टार व्हायचंय? मग चुकूनही दुर्लक्षित करू नका या ५ सेटिंग्ज; व्ह्यूजचा पडेल पाऊस!
11
ICC ODI Rankings: विराट कोहली पुन्हा बनला वनडेचा किंग! हिटमॅन रोहितला बसला फटका
12
मुंबईची निवडणूक निर्णायक ठरणार, मराठी अस्मितेसह या ५ मुद्यांचं भवितव्य निश्चित करणार
13
स्पेनला १५० वर्षांनंतर मिळणार पहिली महाराणी! कोण आहे राजकुमारी लिओनोर? जिच्यासाठी बदलला गेला देशाचा कायदा
14
WPL 2026: Mumbai Indiansच्या सामन्यात दिसली Anaya Bangarची 'ग्लॅमरस' झलक, फोटोंचीही चर्चा
15
कमाल! पहिल्या स्लीपर वंदे भारत ट्रेनचे टाइमटेबल आले; कधी सुटणार, किती थांबे असणार? पाहाच
16
ना OTP, ना PIN! फक्त फिंगरप्रिंट वापरुन बँक खातं होतंय रिकामं; 'आधार स्कॅम'पासून राहा सावध
17
संसदेसह सार्वजनिक ठिकाणांवरून सावरकरांचे फोटो हटवण्याची मागणी, सर्वोच्च न्यायालय याचिकेवर भडकलं; माजी अधिकाऱ्याला सुनावलं
18
मोठी बातमी! निवडणूक आयोग EVM मशीनला 'पाडू' नावाचे नवीन डिव्हाइस जोडणार; राज ठाकरेंच्या आरोपाने नव्या वादाला फोडणी
19
‘भाजपाने राज्यात विषवल्ली जन्माला घातली, मनपा निवडणुकीत ही विषवल्ली कापा’, काँग्रेसचं आवाहन
20
“राहुल गांधींची प्रभू श्रीरामांवर श्रद्धा, आता अयोध्येला जाणार”; काँग्रेस नेते म्हणाले…
Daily Top 2Weekly Top 5

बाळाला प्रवाशांच्या हातात देऊन महिलेने काढला पळ; जाताना ट्रेनमधून फक्त पाहत राहिली

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 2, 2025 13:20 IST

Navi Mumbai Crime News: नवी मुंबईच्या सीवूड स्थानकावर बाळाला सोडून पळ काढणाऱ्या महिलेचा पोलिसांकडून शोध सुरु आहे

Seawoods Station Crime:नवी मुंबईत गेल्या आठवड्यात आश्रमाबाहेर दोन दिवसांच्या बाळाला सोडल्याचे प्रकरण ताजे असतानात आणखी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. अविवाहित असलेल्या जोडप्याने नवजात बाळाला आश्रमाच्या बाहेर सोडून दिलं होतं. पोलिसांनी तांत्रिक तपासाच्या आधारे दोघांनाही शोधून काढलं. दुसरीकडे नवी मुंबईत सीवुड दारावे स्थानकात एक महिलेने प्रवाशांकडे १५ दिवसांच्या बाळाला सोडून पळ काढला. या घटनेनंतर पोलिसांनी महिलेचा शोध सुरु केला आहे. दरम्यान, बाळाला सोडून पळ काढणारी महिला सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे.

सोमवारी दुपारी सीएसएमटी-पनवेल लोकल ट्रेनमध्ये एका महिलेने तिच्या १५ दिवसांच्या बाळाला एका प्रवाशाकडे सोडून दिले. बाळ असल्याने सामान घेऊन उतरता येत नसल्याच्या बहाणा करत महिला पळून गेली. हार्बर लाईनवरील सीवूड्स रेल्वे स्थानकावर ही घटना घडली. वाशी रेल्वे पोलिसांनी अज्ञात महिलेविरुद्ध गुन्हा दाखल केला असून तिचा शोध सुरू केला आहे. 

दिव्या नायडू (१९) ही तरुणी सकाळी ११ वाजताच्या सुमारास तिची मैत्रिण भूमिका मानेसोबत सीएसएमटीहून जुईनगरला जाणाऱ्या लोकल ट्रेनमध्ये चढली. दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास, ट्रेन सानपाडा स्टेशनवरून जात असताना, दोन्ही मैत्रिणी जुईनगरला उतरण्यासाठी दरवाजाकडे गेल्या. त्याच डब्यात ३० ते ३५ वयोगटातील एक अज्ञात महिला त्यांच्यासोबत उभी होती. तिच्या एका हातात तीन बॅगा होत्या आणि दुसऱ्या हातात बाळ होते.

महिलेने दिव्या आणि तिच्या मैत्रिणीला आपण सीवूड्स स्टेशनवर उतरणार आहे पण सामान आणि बाळामुळे एकटी उतरू शकत नाही असं सांगितले. महिलेने दोघींनी सीवूड्सपर्यंत बाळाला हातात घ्या असं सांगितले. मदत करण्याच्या भावनेने त्या दोघे बाळाला घेऊन सीवूड्स येथे उतरले. मात्र ती महिला ट्रेनमधून खाली उतरली नाही. ट्रेन सुरु झाल्यावर ती दोघींकडे पाहत होती. दोघींनाही नेमकं काय घडलं हे कळलचं नाही. त्यानंतर ती महिला बाळाला घ्यायला परत येईल या आशेने दोघीही तिथेच वाट पाहत उभ्या राहिल्या. मात्र जेव्हा ती महिला परत आली नाही तेव्हा त्यांनी  ताबडतोब रेल्वे पोलिसांना कळवले. 

रेल्वे पोलिसांनी बाळाला ताब्यात घेऊन जवळच्या रुग्णालयात दाखल केले. बाळाची प्रकृती स्थिर असून ते १५ दिवसांचे असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. वैद्यकीय तपासणीनंतर, बालकाला बाल कल्याण समितीमार्फत बाल आश्रयस्थानात ठेवण्यात येणार आहे. भारतीय न्याय संहितेच्या कलम ९३ अंतर्गत बाळाला सोडून पळणाऱ्या महिलेविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. महिलेची ओळख पटविण्यासाठी आणि शोधण्यासाठी ट्रेन आणि स्टेशन परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले जात आहे. 

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबईCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसHarbour Railwayहार्बर रेल्वेMumbai Localमुंबई लोकल