शहरं
Join us  
Trending Stories
1
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
2
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
3
निवडणूक आयोगाकडून आतापर्यंत ८८८९ कोटी रुपये जप्त; ड्रग्ज-रोकडसह 'या' गोष्टींवर कारवाई!
4
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
5
मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान होऊ द्या, सहा महिन्यांत पाकव्याप्त काश्मीरही भारताचा भाग झाल्याचे दिसेल- योगी आदित्यनाथ
6
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस, मुंबईत कशी असणार स्थिती?; असा आहे हवामान अंदाज
7
एक चेंडू छतावर, दुसरा स्टँडवर! Virat Kohli चा नवा विक्रम, पण ज्याची भीती होती तेच झालं
8
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
9
विमान प्रवास करताना कान दुखतो का? 'या' 5 सोप्या टिप्स फॉलो करा, नक्कीच वाटेल 'रिलॅक्स'!
10
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 
11
परळीत लोकशाही नव्हे तर गुंडाराज?; व्हिडीओ पोस्ट करत रोहित पवारांचा सवाल
12
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
13
Rohit Sharma अखेर व्यक्त झाला! मुंबई इंडियन्सच्या अपयशाचं खरं कारण सांगितलं, म्हणाला... 
14
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
15
MS Dhoniची फिल्ड प्लेसमेंट, रोहितचा पूल शॉट अन्....; विराटला हवी आहेत ६ खेळाडूंची कौशल्य
16
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
17
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
18
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...
19
PM नरेंद्र मोदींची आज दिल्लीत सभा, १३ देशांचे राजदूत उपस्थित राहणार!
20
"भारतापेक्षा अधिक तेजस्वी, प्रखर लोकशाही जगात कुठेही नाही"; व्हाईट हाऊसने केली स्तुती

अतिक्रमण काढताना आई-मुलीला जिवंत जाळले; अधिकाऱ्यांनीच आग लावली

By ऑनलाइन लोकमत | Published: February 15, 2023 10:36 AM

उत्तर प्रदेशच्या कानपूर जिल्ह्यातील हृदयद्रावक घटना

कानपूर : सोसायटीच्या जमिनीवरील अतिक्रमण हटवताना एका घराला आग लागून त्यात आई आणि तिच्या मुलीचा होरपळून मृत्यू झाल्याची घटना उत्तर प्रदेशातील कानपूर जिल्ह्यात घडली आहे. आपले छोटेसे घर वाचवण्याचा प्रयत्न करणाऱ्या या दोघींना त्याच घरात लागलेल्या आगीत आपली आहुती द्यावी लागली. याबाबत एक व्हिडीओ व्हायरल झाला असून त्यात होरपळण्यापूर्वी काही क्षण आधी सदर महिला अधिकाऱ्यांनीच आग लावल्याचे सांगताना दिसते. 

अधिकारी पळाले, ३९ जणांवर गुन्हासंतप्त लोकांनी आग लावल्याचा आरोप करत गोंधळ सुरू केला. एका अधिकाऱ्यावर कुऱ्हाडीने वार करून त्याला जखमी करण्यात आले. जमावाचा संताप पाहून इतर अधिकाऱ्यांनी पळ काढत जीव वाचवला. आतापर्यंत ३९ अधिकाऱ्यांवर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ते म्हणाले, आगीतून  कोणीही वाचता कामा नये...nप्रमिलाचे पती कृष्ण दीक्षित म्हणाले, “एसडीएम आणि तहसीलदार बुलडोझर घेऊन आले होते. गावातील अनेक लोक त्यांच्यासोबत होते. या लोकांनी अधिकाऱ्यांना आग लावण्यास सांगितले. त्यामुळे अधिकाऱ्यांनी आग लावली. nमी मुलासह कसेतरी झोपडीतून बाहेर पडलो, पण आई आणि मुलगी आतच राहिल्याने जळून मरण पावले. अधिकारी आम्हाला जळते सोडून पळून गेले. कोणीही कसलीही मदत केली नाही. मुलगा शिवम म्हणाला, “एसडीएम, एसओ, लेखपाल या सगळ्यांनी मिळून माझ्या घराला आग लावली. कोणीही आगीतून वाचता कामा नये, असे एसडीएम सांगत होते.

सोमवारी चहला गावात पोलिस आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांचे पथक गावातील सोसायटीच्या जमिनीवरील अतिक्रमण हटवण्यासाठी पोहोचले होते. यावेळी झोपडी पाडण्यात आली आणि तिला आग लावण्यात आली, आई-मुलीला जिवंत जाळण्यात आले, असा आरोप होत आहे. 

आगीत प्रमिला दीक्षित (४१) आणि मुलगी नेहा (२१) यांचा मृत्यू झाला. दोघांना वाचवण्याच्या प्रयत्नात महिलेचा पती कृष्ण गोपाल, घरमालक भाजले.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसKanpur Policeकानपूर पोलीस