धक्कादायक! 7 वर्षीय चिमुकल्या मुलीची हत्या करून आईची आत्महत्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 12, 2020 03:15 IST2020-06-12T03:15:05+5:302020-06-12T03:15:27+5:30

रात्री अकराच्या सुमारास सासूला मुलीच्या ओरडण्याचा आवाज आल्याने त्यांनी हॉलमध्ये धाव घेतली. त्यावेही मुलगी व आई दोघीही रक्ताच्या थारोळ्यात पडल्या होत्या.

Mother commits suicide by killing daughter | धक्कादायक! 7 वर्षीय चिमुकल्या मुलीची हत्या करून आईची आत्महत्या

धक्कादायक! 7 वर्षीय चिमुकल्या मुलीची हत्या करून आईची आत्महत्या

बदलापूर : येथील कात्रप परिसरात बुधवारी रात्री एका महिलेने आपल्या सहा वर्षांच्या मुलीची हत्या करून स्वत: आत्महत्या केली. कात्रप परिसरात एका फ्लॅटमध्ये आई आणि तिच्या मुलीचा मृतदेह आढळला. चाकूने शरीरावर वार करून ही हत्या करण्यात आली आहे. बुधवारी रात्री जेवण उरकल्यावर संबंधित महिला मुलीसोबतच हॉलमध्ये, तर सासू बेडरूममध्ये झोपली होती.

रात्री अकराच्या सुमारास सासूला मुलीच्या ओरडण्याचा आवाज आल्याने त्यांनी हॉलमध्ये धाव घेतली. त्यावेही मुलगी व आई दोघीही रक्ताच्या थारोळ्यात पडल्या होत्या. या प्रकरणी बदलापूर पोलिसांनी सासूच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल केला आहे. संबंधित महिला काही दिवसांपासून मानसिक तणावात असल्याचे शेजाऱ्यांनी सांगितले.

Web Title: Mother commits suicide by killing daughter