माणूस की हैवान? 50 हून अधिक गायींना जंगलात जिवंत केलं दफन; परिसरात एकच खळबळ
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 9, 2021 18:02 IST2021-12-09T17:52:14+5:302021-12-09T18:02:46+5:30
Crime News : गोशाळेतील 50 गायींना जंगलात जिवंत दफन करण्यात आलं आहे.

माणूस की हैवान? 50 हून अधिक गायींना जंगलात जिवंत केलं दफन; परिसरात एकच खळबळ
नवी दिल्ली - उत्तर प्रदेशमध्ये एक संतापजनक घटना समोर आली आहे. 50 हून अधिक गायींना जंगलात जिवंत दफन केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. उत्तर प्रदेशच्या बांदा जिल्ह्यातील नरैनी नगर पंचायत येथील मोतियारी बाजारातील गोशाळेतील 50 गायींना जंगलात जिवंत दफन करण्यात आलं आहे. या प्रकरणात शासनाने कारवाई करून अधिकाऱ्याचं (EO) निलंबन करण्यात आलं आहे. या घटनेवर सर्वत्र संताप व्यक्त करण्यात येत आहे.
नरैनी येथील भारतीय जनता पक्षाचे आमदार राज करण कबीर यांनी या प्रकरणातील मुख्य दोषींविरोधात कारवाईची मागणी केली आहे. या प्रकरणात शासनाने कारवाई करत येथी EO यांचं निलंबन केलं आहे. मुख्य विकास अधिकारी वेद प्रकाश मोर्य यांच्या रिपोर्टनुसार तब्बल 50 गायींना जिवंत दफन करण्याच्या या प्रकरणात इओ प्राथमिकदृष्ट्या दोषी आढळून आले आहेत. तर दुसरीकडे भाजपा आमदार राज करण कबीर यांनी सांगितलं की, छोट्या अधिकाऱ्यांना अडकवण्याचा प्रयत्न केला जात आहे.
मोठ्या अधिकाऱ्यांवर कारवाई कधी होणार? असा सवाल देखील त्यांनी उपस्थित केला आहे. मध्य प्रदेशातील पन्ना जिल्ह्यातील पहाडी खेरा जंगलात 50 हून अधिक गायींना जिवंत दफन करण्यात आलं होतं. यामध्ये उपजिल्हाधिकारी नरैनीदेखील सामील होते असा आरोप केला आहे. कबीर यांनी मुख्य विकास अधिकारीच्या तपासावर सवाल उपस्थित केला आहे. तसेच या घटनेचा तपास केला जात आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. तर कर्नाटकमध्ये एका शेतकऱ्याने आपल्याच गायीची तक्रार केली आहे. गाय दूध देत नाही म्हणून तो तिलाच घेऊन थेट पोलीस ठाण्यात पोहाचला. आपली गाय दूध देत नाही आता तुम्हीच तिला थोडं समजवा अशी विनवणी शेतकऱ्याने चक्क पोलिसांना केली.
'गाय दूध देत नाही आता तुम्हीच तिला थोडं समजवा'; शेतकऱ्याच्या तक्रारीने पोलीसही झाले हैराण
शेतकऱ्याची अशी तक्रार ऐकून पोलीस अधिकारीही हैराण झाले. कर्नाटकच्या शिमोगा जिल्ह्यात ही अजब घटना घडली आहे. सिदलीपूर गावातील शेतकरी रमैया याने होलेहोन्नूर पोलीस ठाण्यात ही अनोखी तक्रार दिली आहे. चारा खायला घातल्यानंतरही आपली गाय दूध देत नाही आहे, असं त्याने पोलिसांना सांगितलं. खरंतर पाळीव प्राण्यांसंबंधी कोणतीही समस्या असेल तर त्यांना प्राण्यांच्या डॉक्टरांकडे नेलं जातं. पण या शेतकऱ्याने गाय दूध देत नाही म्हणून तिला घेऊन थेट पोलीस स्टेशनच गाठलं आहे. शेतकऱ्याच्या या कृतीने ग्रामस्थांनी ही धक्का बसला आहे.