5 वर्षांपासून मेव्हणा भाऊजीची पोलीस म्हणून करत होता नोकरी; प्रकार समोर आला अन्...
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 19, 2021 12:53 IST2021-06-19T12:46:30+5:302021-06-19T12:53:14+5:30
पोलीस विभागात एक अजब प्रकार समोर आला आहे.

5 वर्षांपासून मेव्हणा भाऊजीची पोलीस म्हणून करत होता नोकरी; प्रकार समोर आला अन्...
नवी दिल्ली: पोलीस विभागात एक अजब प्रकार समोर आला आहे. गेल्या 5 वर्षांपासून भाऊजी यांच्याऐवजी मेव्हणा पोलीस म्हणून नोकरी करत असल्याचं समोर आलं आहे. याप्रकरणी आरोपीची चौकशी सुरू आहे. तसंच एका आरोपीला अटक करण्यात आली आहे.
उत्तर प्रदेशच्या मुरादाबादमधील ठाकुरद्वारा ठाण्यात कॉन्स्टेबल अनिल कुमार यांच्याऐवजी त्यांचा मेव्हणा सुनील उर्फ सनी ड्यूटी करत होता. तो 5 वर्षांपासून हे काम करत होता. याप्रकरणी तक्रार करण्यात आल्यानंतर झालेल्या चौकशीत पोलीस विभागातील ही चूक समोर आली. याप्रकणी अनिल कुमार यांना अटक करण्यात आली असून सुनील फरार आहे. पोलीस त्याचा शोध घेत आहे.