व्यापाऱ्याला दीड काेटींचा लावला चुना; सहा जणांविरुद्ध गुन्हा तर एकाला चेन्नईतून घेतले ताब्यात

By ऑनलाइन लोकमत | Published: August 11, 2021 09:00 PM2021-08-11T21:00:26+5:302021-08-11T21:01:18+5:30

Crime News : याबाबत गांधी चाैक पाेलीस ठाण्यात चेन्नई येथील सहा जणांविराेधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. चेन्नई येथून एकाला पोलिसांनी उचले आहे.

Money of The trader was duped; Crime against six persons and one arrested from Chennai | व्यापाऱ्याला दीड काेटींचा लावला चुना; सहा जणांविरुद्ध गुन्हा तर एकाला चेन्नईतून घेतले ताब्यात

व्यापाऱ्याला दीड काेटींचा लावला चुना; सहा जणांविरुद्ध गुन्हा तर एकाला चेन्नईतून घेतले ताब्यात

googlenewsNext
ठळक मुद्देफिर्यादी धनराज नरसिंगदास पल्लाेड (वय ४४ रा. मैत्री पार्क, लातूर) यांना व्यापारासाठी १०० काेटी रुपयांच्या कर्जाची गरज हाेती.

लातूर : शहरातील एका व्यापाऱ्याला १०० काेटींचे कर्ज मिळवून देताे, असे आमिष दाखवत कमिशनपाेटी १ काेटी ५२ लाख ५० हजार रुपयांना गंडविल्याची घटना लातुरात घडली. याबाबत गांधी चाैक पाेलीस ठाण्यात चेन्नई येथील सहा जणांविराेधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. चेन्नई येथून एकाला पोलिसांनी उचले आहे.

पाेलिसांनी सांगितले, फिर्यादी धनराज नरसिंगदास पल्लाेड (वय ४४ रा. मैत्री पार्क, लातूर) यांना व्यापारासाठी १०० काेटी रुपयांच्या कर्जाची गरज हाेती. त्यांनी कर्ज उपलब्ध करुन देणारे एजंट दीपककुमार (रा. माहाेली पंजाब), जतीन शहा (रा. गाेरेगाव इस्ट, मुंबई) यांच्याशी संपर्क केला. दरम्यान, त्यांनी चेन्नई येथील अलमदीना बिझनेस साेल्यूशन ग्रुपचे आदित्य राम, समीर कादरी आणि जिन्ना कादरी हे कर्ज उपलब्ध करुन देतात असे सांगितले. त्यांनी फिर्यादीला चेन्नइ येथे घेवून गेले. तेथे १०० काेटी रुपयांचे कर्ज उपलब्ध करुन देण्याची हमी आणि विश्वास देण्यात आला. त्यामाेबादल्यात त्यांच्याकडून ३ काेटी रुपयांच्या कमिशनची मागणी करण्यात आली. शेवटी तडजाेडीअंती १ काेटी ५२ लाख ५० हजार रुपये कमिशन देण्याचे ठरले. फिर्यादी पल्लाेड यांनी अलमदिना बिझनेस साेल्यूशनच्या बॅक खात्यावर स्वत:च्या बॅक खात्यातून २३ आणि २४ मार्च २०२१ राेजी १ काेटी ५२ लाख ५० हजार रुपये जमा केले. त्यानंतर आराेपींनी कर्ज देण्यास टाळाटाळ केली. यातून आपली फसवणूक झाली आहे, असे फिर्यादीच्या लक्षात आले. 

दरम्यान, पाेलीस अधीक्षक निखिल पिंगळे यांची भेट घेवून घडलेला प्रकार सांगितला. याप्रकरणी गांधी चाैक पाेलीस ठाण्यात गुरनं. ४०१/ २०२१ कलम ४२०, ४०६, ३४ भादंविप्रमाणे समीर कादरी उर्फ इश्वर रमण, आदित्य राम उर्फ इ हरिप्रसाद, जिन्ना कादरी उर्फ अब्दुल्ला उर्फ सुलतान, नरसिंम्हन रामदाेस उर्फ विनाेथ, व्ही. एम. माेहम्मद दाउद खान आणि माेहम्मद अली (सर्व रा. चेन्नई, तामिळनाडू) यांच्याविराेधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

एका आराेपीला अटक...

या प्रकरणातील सहापैकी समीर कादरी उर्फ इश्वर आर. के. रमण याला अटक केली. चाैकशीत फिर्यादीची फसवणूक केलेली १ काेटी ५२ लाख ५० हजारांचा रक्कम परत मिळविण्यात पाेलिसांना यश आले. असे पाेलीस अधीक्षक निखिल पिंगळे यांनी सांगितले.

Web Title: Money of The trader was duped; Crime against six persons and one arrested from Chennai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.