मनी लॉन्ड्रिंग प्रकरणः इंटरपोलने नीरव मोदी यांच्या पत्नीविरूद्ध जारी केले जागतिक अटक वॉरंट

By ऑनलाइन लोकमत | Published: August 26, 2020 12:07 AM2020-08-26T00:07:49+5:302020-08-26T00:09:14+5:30

इंटरपोलने नीरव मोदी आणि त्याचा भाऊ नेहल आणि बहीण पूर्व यांच्याविरूद्ध नोटीसही बजावली आहे.

Money laundering case: Interpol issues global arrest warrant against Nirav Modi's wife | मनी लॉन्ड्रिंग प्रकरणः इंटरपोलने नीरव मोदी यांच्या पत्नीविरूद्ध जारी केले जागतिक अटक वॉरंट

मनी लॉन्ड्रिंग प्रकरणः इंटरपोलने नीरव मोदी यांच्या पत्नीविरूद्ध जारी केले जागतिक अटक वॉरंट

googlenewsNext
ठळक मुद्देनीरव मोदी यांची पत्नी अॅमी मोदीविरोधात मनी लॉन्ड्रिंगच्या आरोपाखाली जागतिक अटक वॉरंट जारी केले आहे, असे मंगळवारी अधिकाऱ्यांनी सांगितले.

इंटरपोलने पंजाब नॅशनल बँकेच्या (पीएनबी) फसवणूक प्रकरणातील मुख्य आरोपी नीरव मोदी यांची पत्नी अॅमी मोदीविरोधात मनी लॉन्ड्रिंगच्या आरोपाखाली जागतिक अटक वॉरंट जारी केले आहे, असे मंगळवारी अधिकाऱ्यांनी सांगितले.

इंटरपोलने नीरव मोदी आणि त्याचा भाऊ नेहल आणि बहीण पूर्व यांच्याविरूद्ध नोटीसही बजावली आहे. इंटरपोल रेड कॉर्नर नोटिस एक प्रकारे आंतरराष्ट्रीय अटक म्हणून काम करते, त्यानंतर आता प्रत्यर्पण प्रक्रिया सुरू केली जाईल. जुलै महिन्याच्या सुरुवातीच्या काळात ब्रिटनमधील फरार हिरे व्यावसायिका नीरव मोदी याच्या न्यायालयीन कोठडीत 6 ऑगस्टपर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती. भारत प्रत्यार्पणासाठी खटला सुरू आहे. नीरवची ओळख परेड 6 ऑगस्टला यूकेच्या कोर्टासमोर व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे झाली होती. यानंतर नीरव मोदी यांच्या ताब्यात कालावधी 27 ऑगस्टपर्यंत वाढविण्यात आला. गेल्या वर्षी मार्च महिन्यात अटक झाल्यापासून 49 वर्षांचा हिरे  व्यावसायिका दक्षिण-पश्चिम लंडनच्या वँड्सवर्थ कारागृहात दाखल आहे.

जानेवारी २०१८ मध्ये नीरव आणि अॅमी मोदी भारतातून पळून गेले होते. त्यानंतर नीरवला गेल्या वर्षी लंडनमध्ये अटक झाली. सध्या तो वाॅंडर्सवर्थ तुरुंगात आहे.भारताकडे प्रत्यार्पण होऊ नये, म्हणून नीरव कायदेशीर लढाई लढत आहे. त्याला २७ ऑगस्टपर्यंत कोठडी सुनावण्यात आली आहे. नीरवला अटक होण्यापूर्वी अॅमी मोदी अमेरिकेत पळून गेल्याचा संशय तपास यंत्रणांनी व्यक्त केला आहे. नीरव मोदीने पीएनबी बँकेतून कर्ज काढण्यासाठी स्थापन केलेल्या बनावट कंपन्यांची अॅमी मोदी संचालक आहे. गेल्या वर्षी मार्च महिन्यात ईडीने पीएनबी मनी लाँडरिंग प्रकरणी अॅमी मोदीवर गुन्हा दाखल केला आहे.
 

 

 

न्य महत्वाच्या बातम्या...

 

मोठी बातमी! महाड तालुक्यात पाच मजली इमारत कोसळली, अनेकजण अडकल्याची भीती

 

पत्नी सेक्स करू देत नसल्याने पतीने केली आत्महत्या, पोलिसात गुन्हा दाखल

 

 

चिमुकल्या मुलींसह आईने स्वत:ला संपविले, राजापूर तालुक्यातील रायपाटण येथील दुर्घटना

 

सुशांत सिंग राजपूत प्रकरणात मुंबई पोलीस बॅकफूटवर; जाणून घ्या, सीबीआय कसा करणार तपास?

 

Web Title: Money laundering case: Interpol issues global arrest warrant against Nirav Modi's wife

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.