शहरं
Join us  
Trending Stories
1
अंतराळातून भारताचे तेजस्वी दर्शन; दररोज १६ सूर्योदय, १६ सूर्यास्त पाहातो; अंतराळवीर शुभांशू यांना पंतप्रधानांचा व्हिडीओ कॉल
2
बाबासाहेबांना एकच संविधान अभिप्रेत असल्याने कलम ३७० हटवण्यावर मोहर
3
दहशतवादी साकिब नाचनचे दिल्लीत निधन, सिमी, इसिससाठी काम; ‘तिहार’मध्ये बिघडली प्रकृती
4
दोन ठाकरे एकत्र येणार की निर्णयच बदलणार?
5
त्यांनी घरून मोबाइलवर केले मतदान, आपला नंबर कधी ?
6
रीलसाठी आयफोनची चोरी; फोनमालकाचा चिरला गळा
7
‘कांटा लगा’ फेम शेफालीचा मृत्यू कशामुळे?, प्रकृती बिघडली, रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच मृत्यू
8
आधी कारने उडवले, मग शस्त्राने भोसकले; अमरावतीत पोलिस अधिकाऱ्याचा खून
9
शिंदे गटाचे नेते तानाजी सावंत यांची प्रकृती बिघडली; रुग्णालयात दाखल, ICUमध्ये उपचार सुरू
10
ENG W vs IND W : स्मृतीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाचा मोठा विजय; इंग्लंडवर ओढावली नामुष्की
11
स्मृती मानधनानं पहिल्या टी-20I सेंच्युरीसह रचला इतिहास, असा पराक्रम करणारी ती पहिलीच
12
एअर इंडियाच्या विमानात बसला, दारू प्यायला अन् महिला कर्मचाऱ्यासोबत... ; लँडिंग होताच प्रवासी पोलिसांच्या ताब्यात!
13
"उत्तर भारतीयांना तमिळ शिकायला सांगा"; हिंदी शत्रू नाही म्हणणाऱ्या अमित शाहांना कनिमोळींचे प्रत्युत्तर
14
भारताचा बांगलादेशला मोठा झटका, 'या' गोष्टीवर घातली बंदी! का घेतला मोठा निर्णय?
15
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
16
आता आणखी कोण? काँग्रेसचा मोठ्या पदावरील बडा नेता भाजपात जाणार? निवडणुकीपूर्वी धक्का बसायची चिन्हे
17
पैसे तयार ठेवा! लवकरच येणार Meesho चा IPO, काय आहे कंपनीचा प्लान? पाहा डिटेल्स 
18
मुंबईचे डबेवाले एक दिवसाच्या सुट्टीवर जाणार! काय आहे कारण? जाणून घ्या...
19
“तुमचा वाईट पद्धतीने पराभव केला, तुम्ही आता नरकात...”; ट्रम्प यांचा खामेनी यांच्यावर प्रहार
20
“काँग्रेसचा विचार संपवू शकत नाही, वहिनींना पक्षात घेऊन...”; विशाल पाटलांची भाजपावर टीका

‘‘आई मी जीवनाला कंटाळून हा टोकाचा निर्णय घेतोय,मला माफ कर गं..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 12, 2020 19:25 IST

मोटारीत सापडलेल्या लॅपटॉपमध्ये ‘त्याने’ लिहिले टोकाच्या निर्णयाचे कारण

ठळक मुद्देदहा सप्टेंबरला पर्वत पारोडा या भागातील जंगलात प्रा. च्यारी यांचा गळफास लावलेल्या अवस्थेतील मृतदेह सापडला होता. २९ आॅगस्ट रोजी ते घरातून अचानक गायब झाले होते.

पणजी : घरातील वाद आणि दबाव तसेच पत्नी व पालकांमधील बेबनाव यांमुळेच गोवा विद्यापीठाचे साहाय्यक प्राध्यापक विशाल च्यारी यांनी आत्महत्या करण्याचा टोकाचा निर्णय घेतल्याचे आता दिसून आले आहे. दहा सप्टेंबरला पर्वत पारोडा या भागातील जंगलात प्रा. च्यारी यांचा गळफास लावलेल्या अवस्थेतील मृतदेह सापडला होता. २९ आॅगस्ट रोजी ते घरातून अचानक गायब झाले होते.

प्रा. च्यारी यांची मोटार चंद्रेश्वर पर्वताच्या पायथ्याशी केपे पोलिसांना सापडली होती. या मोटारीत पोलिसांना त्यांचा लॅपटॉप सापडला. त्यात वरील मृत्यूपूर्व पत्र वाचायला मिळाले होते. परंतु असा मजकूर लिहिलेला माणूस टोकाचे पाऊल उचलतोच असे नाही. त्यामुळे पोलिसांनी तो मजकूर गुलदस्त्यातच ठेवला होता.प्रा. विशाल च्यारी यांची पत्नी व कुटुंबीयांबरोबरच्या तेढामुळे प्रचंड कुचंबणा होत होती. विजातीय विवाह तसेचइतर कौटुंबिक ताणतणाव यामुळे ते आयुष्यालाच कंटाळले होते. निकटवर्तीय सांगतात, प्रा. च्यारी हे अत्यंत सौजन्यशील, सौम्य स्वभावाचे होते. आपले काम बरे आणि आपण बरे, या प्रवृत्तीचा हा शिक्षक जीवनातील हा तणाव सहन करू शकला नाही आणि त्याने ही कुत्तरओढ एकदाची संपविण्याचा निर्णय घेतला.प्रा. च्यारी यांची पत्नीही उच्चशिक्षित असून तिलाही स्वतंत्रपणे संसार करण्याची ओढ होती. परंतु प्रा. च्यारी आपल्या आई वडिलांना सोडून वेगळे राहू इच्छित नव्हते. आपल्या आई-वडिलांमुळेच मी शिक्षण घेऊ शकलो, चांगले जीवन त्यांच्यामुळेच माझ्या वाट्याला आले, त्यांना मी कसे अंतर देऊ शकतो? ... ‘‘आई मी जीवनाला कंटाळून हा टोकाचा निर्णय घेत आहे. तुम्हाला सोडून जात आहे तेव्हा मला माफ कर गं..’’ असे भावोत्कट शब्दांतील हे मृत्यूपूर्वपत्र लॅपटॉपमध्ये टाईप करून ठेवले आहे. पत्नी व आई-वडील यांच्या मतभेदांचे प्रसंग अनेक कुटुंबांत येतात. प्रा. विशाल च्यारी यांचा तर प्रेमविवाह झाला होता. तेव्हा एक तर वेगळे राहणे किंवा घटस्फोट घेऊन या तणावातून कायमचे दूर होणे असे दोन पर्याय त्यांच्याकडे होते. परंतु सुशिक्षित तरुणाने अशा पद्धतीने जीवन संपवावे हे काही लोकांना रुचलेले नाही. त्यामुळे एका बाजूला या मृत्यूबद्दल हळहळ व्यक्त होत असतानाच विद्यापीठातील प्राध्यापक खेद व्यक्त करताना गुरुवारी दिसले. गुरुवारी त्यांच्यासाठी विद्यापीठाने शोकसभा आयोजित केली होती.

प्रा. विशाल च्यारी यांनी लॅपटॉपमधील मृत्यूपूर्व पत्रात आई-वडिलांबद्दल कृतज्ञता व्यक्त केली असली तरी पत्नीला दोष दिलेला नाही. वास्तविक या पत्रात ते कोणालाही दोष देत नाहीत.

मृत्यूपूर्व पत्रात अत्यंत भावोत्कट शब्द..‘‘आई मी जीवनाला कंटाळून हा टोकाचा निर्णय घेत आहे. तुम्हाला सोडून जात आहे तेव्हा मला माफ कर गं..’’ असे भावोत्कट शब्दातील आपले हे मृत्यूपूर्वपत्र प्रा. विशाल च्यारी यांनी लॅपटॉपमध्ये टाईप करून ठेवले आहे.

 

न्य महत्वाच्या बातम्या...

 

हरभजनला ४ कोटींचा उद्योगपतीने घातला गंडा, पोलिसात तक्रार दाखल 

 

बॉयफ्रेंडसोबत पत्नी हॉटेलमध्ये आक्षेपार्ह स्थितीत आढळली, पतीने चप्पलेने हाणले 

 

दणका! रियासह इतर आरोपींचा जामीन कोर्टाने फेटाळला

 

सुशांतच्या फ्लॅटच्या टेरेसवर वारंवार जात होती सीबीआय आणि फॉरेन्सिक टीम  

 

धक्कादायक! मंदिरात चोरट्यांनी घुसून तीन पुजाऱ्यांची केली निर्घृण हत्या 

 

दया नायक यांची धडाकेबाज कारवाई, उद्धव ठाकरेंना धमकी देणाऱ्यास केली अटक

 

टॅग्स :Suicideआत्महत्याPoliceपोलिसgoaगोवा