वर्कशॉपमधील कामगाराकडून महिलेचा विनयभंग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2020 19:00 IST2020-01-25T18:59:41+5:302020-01-25T19:00:12+5:30

वर्कशॉपमधील कामगाराने मनास लज्जा उत्पन्न होईल, असे कृत्य करून विनयभंग.

Molestation OF women BY workshop worker | वर्कशॉपमधील कामगाराकडून महिलेचा विनयभंग

वर्कशॉपमधील कामगाराकडून महिलेचा विनयभंग

ठळक मुद्देयाप्रकरणी ३० वर्षीय महिलेची भोसरी एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद

पिंपरी : वर्कशॉपमधील कामगाराने मनास लज्जा उत्पन्न होईल, असे कृत्य करून महिलेचा विनयभंग केला. भोसरी एमआयडीसीत शुक्रवारी (दि. २४) सकाळी सहाच्या सुमारास हा प्रकार घडला. हुशेनसाब निसार अहमद शेख (वय २७, रा. त्रिवेणीनगर, तळवडे, मूळ रा. चौकीमठ होसूर गल्ली, हलीयाला उत्तरा कन्नाडा, कर्नाटक) असे आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी ३० वर्षीय महिलेने भोसरी एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिलेच्या पतीचे भोसरी एमआयडीसीत वर्कशॉप आहे. तेथे आरोपी शेख कामगार म्हणून कामास आहे. फिर्यादी शुक्रवारी सकाळी सहाच्या सुमारास वर्कशॉपमध्ये गेल्या. त्यावेळी आरोपी शेख तेथे आला. क्या मॅडम आज सुबह सुबह कंपनी आये हो, असे म्हणून आरोपी शेख याने मनास लज्जा उत्पन्न होईल, असे कृत्य करून फियार्दी महिलेचा विनयभंग केला. भोसरी एमआयडीसी पोलीस तपास करीत आहेत.

Web Title: Molestation OF women BY workshop worker

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.