घरात एकटी असल्याची संधी साधून केला अत्याचार, शिंदखेडा तालुक्यातील घटना
By देवेंद्र पाठक | Updated: May 7, 2023 18:08 IST2023-05-07T18:08:13+5:302023-05-07T18:08:48+5:30
याप्रकरणी शनिवारी मध्यरात्री नरडाणा पोलिस ठाण्यात एकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. संशयित घटनेनंतर फरार झाला आहे.

घरात एकटी असल्याची संधी साधून केला अत्याचार, शिंदखेडा तालुक्यातील घटना
धुळे : घरात एकटी असल्याची संधी साधून एकाने घरात घुसून तिच्यावर बळजबरीने अत्याचार केल्याची घटना शिंदखेडा तालुक्यातील एका गावात गुरुवारी दुपारी घडली. या घटनेमुळे महिला घाबरली असून, याप्रकरणी शनिवारी मध्यरात्री नरडाणा पोलिस ठाण्यात एकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. संशयित घटनेनंतर फरार झाला आहे.
शिंदखेडा तालुक्यातील एका गावात एक महिला घरात एकटी होती. ही संधी एकाने साधली. माझे तुझ्यावर प्रेम आहे. तू मला आवडते. तू खूप सुंदर आहेस असे बोलून तिच्यावर बळजबरी केली. तिला पलंगावर ढकलून तिच्यावर अत्याचार केला. ही घटना गुरुवारी दुपारी १ ते दीड वाजेच्या सुमारास घडली. तिने आरडा ओरड केल्याने संशयित पळून गेला. या घटनेमुळे महिला घाबरून गेली. स्वत:ला सावरत तिने ही बाब घरातील अन्य सदस्यांना सांगितली.
त्यानंतर स्वत:ला सावरत तिने नरडाणा पोलिस ठाणे गाठत पोलिसांना आपबिती कथन केली. यानंतर शनिवारी मध्यरात्री एकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. साक्री विभागाचे उपअधीक्षक प्रदीप मैराळे घटनेचा तपास करीत आहेत. संशयित घटनेनंतर फरार झालेला आहे.