शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

मुख्याध्यापकाचे विद्यार्थिनीशी चाळे; संतप्त पालकांनी शाळेला ठोकले टाळे

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 30, 2019 20:29 IST

संबधित शिक्षकावर कडक कारवाई करण्याची मागणी...

ठळक मुद्देवहागाव- देशमुखवाडीतील घटना : शिक्षकावर कारवाईची मागणी

आंबेठाण : वहागाव-देशमुखवाडी (ता.खेड ) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील मुख्याध्यापकाने शाळेतील विद्यार्थिनींशी अश्लीलपणे बोलून त्यांचा विनयभंग केल्याचा प्रकार उघडकीस आल्याने संतप्त झालेल्या पालकांनी  शाळेवर मोर्चा काढत  कुलूप ठोकून शाळा बंद केली. तसेच संबधित शिक्षकावर कडक कारवाई करण्याची मागणी केली.   खेड तालुक्याच्या पश्चिम भागातील वहागाव - देशमुखवाडी या दोन गावामिळून जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आहे. या शाळेमध्ये वरील दोन गावांसह कोळीये येथील पाचवीतील मुलेही या शाळेत येत आहेत. जवळपास १४० पट असलेल्या शाळेत चंद्रकांत रामाणे हा मुख्याध्यापक म्हणून काम करत आहे. मात्र, पंधरा ऑगस्टपासून संबधित शिक्षकाने शाळेतील विद्यार्थिशी लगट करणे, अश्लिल बोलणे तसेच त्यांना लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन करत होता. तसेच या बाबत कुठे बाहेर व्याच्याता करू नये म्हणून दमबाजी करत धमकी विद्यार्थीनींना देत होता. या गोष्टीना कंटाळून अखेर या मुलींनी ही बाब सोमवारी घरी सांगीतली. त्यामुळे दोन्ही गावातील संतप्त नागरिकांनी सोमवारी (दि ३०)   सकाळी १० वाजता शाळेत एकच गर्दी केली. याची कुणकुण लागल्याने हा मुख्याध्यापक शाळेत आलाच नाही.    ग्रामस्थांनी वरिष्ठ अधिका-यांशी संपर्क साधून हा प्रकार कळवला. त्याप्रमाणे केंद्रप्रमुख भारती उबाळे  सकाळी शाळेत आल्या.   ग्रामस्थांनी त्यांना या शिक्षकाचे अनेक कारनामे सांगितले. शाळेत रोज उशिरा येणे, मुलांना न शिकवता शाळेत झोपणे आदी तक्रारी केल्या. त्यानंतर संतप्त ग्रामस्थांनी या शिक्षकावर जोपर्यंत कडक कारवाई करावी म्हणून शाळेला कुलूप ठोकले. त्यामुळे आलेली विद्यार्थी परत घरी गेले. अन्य शिक्षकांना देखील ग्रामस्थांच्या रोषाला सामोरे जावे लागले. यावेळी सरपंच संजय देशमुख, सुभाष नवले, आत्माराम देशमुख, वहागावचे माजी सरपंच किसन बनले, तानाजी नवले, सत्यवान भालसिंग, रमेश भालसिंग आदींसह ग्रामस्थांचे वतीने देशमुख यांनी निलंबनाची कारवाई करावी अशी मागणी केली. जबाबदार अधिकारी जो पर्यंत शाळेत येत नाही तोपर्यंत शाळेचे टाळे खोलले जाणार नाहीत असेही त्यांनी सांगितले.--------------------------------------------

टॅग्स :KhedखेडMolestationविनयभंगCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसStudentविद्यार्थीSchoolशाळा