Molestation of minor girls through video calling; The accused was arrested from Gujarat | व्हिडीओ कॉलिंगद्वारे अल्पवयीन मुलींचा विनयभंग; आरोपीला गुजरातमधून अटक
व्हिडीओ कॉलिंगद्वारे अल्पवयीन मुलींचा विनयभंग; आरोपीला गुजरातमधून अटक

ठळक मुद्दे२० वर्षीय आरोपीला वाकोला पोलिसांनी गुजरातच्या अहमदाबादमधून अटक केली आहे.पोरवाल चांगल्या कुटुंबातील असून तो मागच्या तीन महिन्यांपासून हा गुन्हा करत होता अशी माहिती पोलीस सूत्रांनी दिली.त्याने पीडित मुलींना विवस्त्र होण्यासाठी भाग पाडले व ते रेकॉर्ड करुन तो दोन्ही मुलींना त्रास देत होता अशी माहिती पोलीस अधिकाऱ्याने दिली.

मुंबई - पॉर्न फोटोंच्या सहाय्याने मुंबईतील सांताक्रूझ परिसरात राहणाऱ्या दोन अल्पवयीन मुलींना ब्लॅकमेल करणाऱ्या आणि व्हिडीओ कॉलद्वारे त्याचा विनयभंग करणाऱ्या २० वर्षीय आरोपीला वाकोला पोलिसांनी गुजरातच्या अहमदाबादमधून अटक केली आहे. आरोपीने या दोन पीडित मुलींच्या चेहऱ्यापर्यंतचा भाग मॉर्फ करुन तो भाग पॉर्न फोटोंवर लावले होते. जानम पोरवाल (२०) असं आरोपीचं नाव असून त्याने मॉर्फ केलेले हे फोटो दोन्ही मुलींच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर पाठवले.

दोन्ही मुली अल्पवयीन आहेत अशी माहिती वाकोला पोलिसांनी दिली. जानमने या दोन्ही मुलींना व्हिडिओ चॅटवर येण्यासाठी जबरदस्ती केली. त्याने पीडित मुलींना विवस्त्र होण्यासाठी भाग पाडले व ते रेकॉर्ड करुन तो दोन्ही मुलींना त्रास देत होता अशी माहिती पोलीस अधिकाऱ्याने दिली. एका मुलीने जानमकडून होणाऱ्या त्रासाबद्दल तिच्या आई - वडिलांना सांगितले. जानम पोरवाल या दोन्ही मुलींना स्पूफ कॉलवरुन फोन करायचा. त्यामुळे या मुलींच्या फोनच्या डिस्प्लेवर परदेशातील फोननंबर दिसायचा. जानम जेव्हा या मुलींना फोन करायचा तेव्हा त्याने त्याचा चेहरा झाकलेला असायचा असे एका मुलीने जबाबत नमूद केले आहे. स्पुफींग टेक्नोलॉजीमुळे आरोपीला पकडायला पोलिसांना १ महिना लागला. पोरवाल चांगल्या कुटुंबातील असून तो मागच्या तीन महिन्यांपासून हा गुन्हा करत होता अशी माहिती पोलीस सूत्रांनी दिली.


Web Title: Molestation of minor girls through video calling; The accused was arrested from Gujarat
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.