शहरं
Join us  
Trending Stories
1
Monorail Mumbai: मोनो रेल्वे पुन्हा बंद पडली, भर पावसात प्रवाशांना काढले बाहेर
2
Maharashtra Rain: आजचा दिवस पावसाचा, संपूर्ण महाराष्ट्राला झोडपणार; चार जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
3
४० हजार एन्ट्री फी, अख्खी रात्र 'Nude Party'; विना कपडे येणार होते २१ मुले-मुली, आयोजकांना अटक
4
पाकिस्तानवर ‘फिरकी बाॅम्ब’; इंडियाचा मैदानावरही 'बदला'; हायव्होल्टेज सामन्यात पाकचा दणदणीत पराभव
5
सकाळपासून ते रात्री झोपेपर्यंतच्या सर्व उत्पादनांवर जीएसटी सवलत मिळणार; निर्मला सीतारामण यांचा दावा
6
आजचे राशीभविष्य- १५ सप्टेंबर २०२५: रागावर नियंत्रण ठेवा, कुटुंबियांशी वादविवाद टाळावेत!
7
‘जिल्हा परिषदां’ना बळ मिळेल? पूर्वी जिल्हा परिषद अध्यक्षांना राज्यमंत्री पदाचा दर्जा होता
8
सायबर भामट्यांनी साेडले खात्यात केवळ ८६ रुपये; बोलण्यात गुंतवून पाठवली लिंक
9
मी शिवभक्त, विष गिळून टाकतो, पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल; काँग्रेसने घुसखोरांना प्रोत्साहन दिले, गरिबांना नाकारले
10
महाराष्ट्रात एका वर्षात ‘आयुष्मान’चे लाभार्थी तिप्पट; ग्रामीण भागापर्यंत विस्तार करण्याचे राज्यासमोर आव्हान
11
पूजा खेडकरांच्या घरातून अपहृत चालकाची सुटका; ऐरोलीत अपघात, कारमध्ये कोंबून नेले पुण्याला
12
मोबाइलमध्ये अडकलेली तरुणाई सरस्वतीच्या दरबारात नेणार : विश्वास पाटील
13
प्रभादेवी तिकीट कार्यालयाचे स्थलांतर कुठे? २ ते ३ दिवसांमध्ये जागा निश्चित करणार
14
बांधकामातील बदल, कराने वाढला कोस्टल रोडचा खर्च; महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या शेवटच्या टप्प्यात २ हजार कोटींची वाढ
15
नेपाळच्या आगीत कोण आपली पोळी भाजते आहे?
16
साहित्य संमेलनाध्यक्षपदी ‘पानिपत’कार विश्वास पाटील ; १ ते ४ जानेवारीदरम्यान संमेलन होणार
17
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
18
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
19
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”

मोदी सरकारची कारवाई! हाफिज सईदचा मेहुणा, दाऊदच्या भावासह १८ जण दहशतवादी म्हणून घोषित  

By पूनम अपराज | Updated: October 30, 2020 21:09 IST

Terrorism : नव्या कायद्यांतर्गत आतापर्यंत 31 दहशतवाद्यांची नावे उघडकीस आली आहेत.

ठळक मुद्देऑगस्ट 2019 मध्ये मोदी सरकारने यूएपीए कायद्यात सुधारणा करून दहशतवादी घोषित करण्याच्या तरतूदीचा समावेश केला.

दहशतवादाविरोधात शून्य सहिष्णुतेच्या धोरणावर काटेकोरपणे कार्य करत मोदी सरकारने डी-कंपनीचा छोटा शकील, रऊफ असगर आणि हिजबुल चीफ सलाउद्दीन यांच्यासह 18 जणांना दहशतवादी घोषित केले.  Unlawful Activities Prevention Act 1967 (UAPA) अंतर्गत त्यांना दहशतवादी घोषित करण्यात आले आहे. नव्या कायद्यांतर्गत आतापर्यंत 31 दहशतवाद्यांची नावे उघडकीस आली आहेत.ऑगस्ट 2019 मध्ये मोदी सरकारने यूएपीए कायद्यात सुधारणा करून दहशतवादी घोषित करण्याच्या तरतूदीचा समावेश केला. या दुरुस्तीपूर्वी केवळ संघटनाच दहशतवादी संघटना म्हणून घोषित करता येत होत्या. उपरोक्त दुरुस्तीनंतर केंद्र सरकारने सप्टेंबर 2019 मध्ये 4 आणि जुलै 2020 मध्ये 9 जणांना दहशतवादी घोषित केले. राष्ट्रीय सुरक्षा बळकट करण्याच्या वचनबद्धतेवर आणि दहशतवादाविरूद्ध शून्य सहिष्णुता धोरणात मजबुती आणताना मोदी सरकारने आज नवीन युएपीए कायद्यांतर्गत 18 जणांना दहशतवादी म्हणून घोषित केले आणि त्यास या कायद्याच्या चौथ्या अधिसूचित समाविष्ट केले.१. साजिद मीर, उर्फ साजिद मजीद उर्फ इब्राहिम शाह उर्फ वसी उर्फ खली उर्फ मोहम्मद वसीम, लश्कर-ए-तैयबा (एलईटी)पाकिस्तानमध्ये लष्कर-ए-तैयबाचे तळ ठोकणारे कमांडर आणि 26/11/2008 मुंबई दहशतवादी हल्ल्याचा मुख्य नियोजक.२. यूसुफ मुझमिल, उर्फ अहमद भाई उर्फ युसुफ मुझमिल बट उर्फ हुरेरा भाई, लष्कर-ए-तैयबा (एलईटी)जम्मू-काश्मीरमधील एलईटी कारवायांचा कमांडर आणि २६/११ च्या मुंबई दहशतवादी हल्ल्यातील आरोपी.३. अब्दुर रहमान मक्की, अब्दुल रहमान मक्की-लष्कर-ए-तैयबा (एलईटी), हा हाफिज सईदचा मेहुणा आहे. एलईटीच्या Political Affairs foreign and relations department चा प्रमुख आहेत.४. शाहिद मेहमूद, उर्फ शाहिद मेहमूद रहमतुल्ला, लष्कर-ए-तैयबाहा  बंदी घातलेल्या संघटना फला-ए-इंसानियातचे उपप्रमुख असून ही LET ची विशेष शाखा आहे.५. फरहतुल्लाह घोरी, उर्फ अबू सुफियान उर्फ सरदार साहेब उर्फ फारू, लष्कर-ए-तैयबा (एलईटी) आणि जैश-ए-मोहम्मद (JeM)अक्षरधाम मंदिर हल्ला (२००२) आणि हैदराबादमधील टास्क फोर्स कार्यालयात झालेल्या आत्मघातकी हल्ल्यात (२०० 2005) यात त्याचा सहभाग होता.६.  अब्दुल रऊफ असगर, उर्फ मुफ्ती उर्फ मुफ्ती असगर उर्फ साद बाबा, उर्फ मौलाना मुफ्ती रऊफ असगर, जैश-ए-मोहम्मद (JeM)पीओकेमध्ये दहशतवादी छावण्या उभारण्यात सहभागी. संसद भवन हल्ल्याचा मुख्य नियोजक (13.12.2001).७.अथर इब्राहिम, उर्फ अहमद अली मोहम्मद अली शेख उर्फ जावेद अमजद सिद्दीकी, उर्फ ए.ए. शेख उर्फ चीफ, जैश-ए-मोहम्मद (JeM)कंधार विमान अपहरणात सामील झाले होते८. युसूफ अझहर उर्फ अझर यूसुफ उर्फ मोहम्मद सलीम, जैश-ए-मोहम्मद (JeM)मौलाना मसूद अझरचा मेहुणा आहे. कंधार हा विमान अपहरणात सामील होता.९. शाहिद लतीफ उर्फ छोटा शाहिद भाई उर्फ नूर अल दिन, जैश-ए-मोहम्मद (जेएम)सियालकोट सेक्टरमध्ये लॉन्चिंग कमांडर आहे आणि हा दहशतवादी हल्ल्यांचे नियोजन, सुविधा यात सहभागी आहे.१०. सय्यद मोहम्मद युसुफ शहा उर्फ सय्यद सलाहुद्दीन उर्फ पीर साहब उर्फ वडील, हिज्बुल मुजाहिद्दीन (एचएम)हिजबुल हा मुजाहिद्दीनचा सर्वोच्च कमांडर आणि युनायटेड जिहाद कौन्सिल यूजीसीचे अध्यक्ष) आहे. दहशतवादी वित्तपुरवठ्यात सामील आहे.११. गुलाम नबी खान, उर्फ अमीर खान उर्फ सैफुल्ला खान उर्फ खालिद सैफुल्ला उर्फ जावेद, हिजबुल मुजाहिद्दीन (एचएम)हिजबुल हा मुजाहिद्दीनचा उप-सर्वोच्च कमांडर आहे.१२.जाफर हुसेन भट्ट, उर्फ खुर्शीद उर्फ मोहम्मद जफर खान उर्फ मौलवी उर्फ खुर्शीद इब्राहिम, हिजबुल मुजाहिद्दीन (एचएम)हिजबुल मुजाहिद्दीनच्या आर्थिक बाबींकडे लक्ष ठेवतो. काश्मीर खोऱ्यात कार्यरत दहशतवाद्यांना पैसे पुरवतो.13. रियाज इस्माईल शाहबंदरी उर्फ शाह रियाज अहमद (पासपोर्टमधील नाव) उर्फ रियाज भटकळ उर्फ मोहम्मदरायझ उर्फ अहमदभाई उर्फ रसूल खान उर्फ रोशनखान उर्फ अजीज, इंडियन मुजाहिद्दीनइंडियन मुजाहिद्दीनचे संस्थापक सदस्य आहेत. हैदराबाद (२००७), जयपूर, दिल्ली आणि अहमदाबाद (२००८), हैदराबाद (२०१३), जर्मन बेकरी (२०१०), चिन्नास्वामी स्टेडियम बेंगलुरू (२०१०) आणि मुंबई (२०११) या बॉम्बस्फोटात मुख्य सूत्रधार सहभागी होते.१४. मोहम्मद इक्बाल उर्फ शबंद्री मोहम्मद इक्बाल उर्फ इकबाल भटकळ, इंडियन मुजाहिद्दीन (आयएम)आयएमचा सहसंस्थापक आहे. आयएम संस्थेच्या निधी संकलनाची जबाबदारी होती. जयपूर सीरियल ब्लास्ट (२००८), दिल्ली सिरीयल ब्लास्ट (२००८), सीरियल ब्लास्ट (२००८), जर्मन बेकरी ब्लास्ट (२०१०) आणि चिन्नास्वामी स्टेडियम ब्लास्ट (२०१०) अहमदाबाद आणि सूरज या अनेक दहशतवादी घटनांमध्ये तो सहभागी होता.१५. शेख शकील उर्फ छोटा शकील, डी-कंपनीदाऊदचा सहकारी. डी-कंपनीच्या भारत-आधारित हस्तकांना निधी प्रदान करते.१६. मोहम्मद अनीस शेख, डी-कंपनीदाऊदचा सहकारी आणि धाकटा भाऊ. 1993 च्या मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणात सामील.१७. इब्राहिम मेमन, उर्फ टायगर मेमन उर्फ मुश्ताक उर्फ सिकंदर उर्फ इब्राहिम अब्दुल रझाक मेमन उर्फ मुस्तफा उर्फ इस्माईल डी-कंपनी१९९३ च्या मुंबई बॉम्बस्फोटांमध्ये सामील आहे. सध्या पाकिस्तानात राहतो१८. जावेद स्मूथ जावेद दाऊद टेलर, डी-कंपनीदाऊद इब्राहिमचा साथीदार.१९९३ च्या मुंबई बॉम्बस्फोटांमध्ये सामील आहे.हे सर्व सीमा ओलांडून झालेल्या दहशतवादाच्या विविध घटनांमध्ये सामील आहेत आणि त्यांच्या घृणास्पद कृत्याद्वारे देशाला अस्थिर करण्याचा सतत प्रयत्न करत आहेत. गृहमंत्रालयाने यापूर्वी 9 खलिस्तानींवर बंदी घातली होती. गेल्या वर्षी मसूद अझर, दाऊद इब्राहिम, हाफिज सईद आणि लष्कर-ए-तैयबा कमांडर झाकी-उर-रहमान लखवी यांच्यावर बंदी घालण्यात आली होती.

टॅग्स :terroristदहशतवादीPakistanपाकिस्तानLashkar-e-taibaलष्कर-ए-तोयबाIndiaभारतGovernmentसरकारhafiz saedहाफीज सईदDawood Ibrahimदाऊद इब्राहिमChhota Shakeelछोटा शकील26/11 terror attack26/11 दहशतवादी हल्ला