Model Gang Rape: फोटोशूटसाठी लॉजवर थांबलेल्या २७ वर्षीय मॉडलसोबत गॅंगरेप, व्हिडीओही केला रेकॉर्ड
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 7, 2021 12:41 IST2021-12-07T12:40:34+5:302021-12-07T12:41:20+5:30
Model gang rape Kerela _ पीडित मॉडलने तक्रार केली की, आरोपींनी एक डिसेंबर ते तीन डिसेंबरपर्यंत तिच्यावर बलात्कार केला. आरोपींनी या घटनेचा व्हिडीओ देखील बनवला.

Model Gang Rape: फोटोशूटसाठी लॉजवर थांबलेल्या २७ वर्षीय मॉडलसोबत गॅंगरेप, व्हिडीओही केला रेकॉर्ड
केरळ (Kerala) पोलिसांनी कोच्चीमध्ये (Kochi) फोटोशूटसाठी आलेल्या एका मॉडलवरील कथित सामूहिक बलात्कार (model gang rape) प्रकरणी एका व्यक्तीला अटक केली आहे. पोलिसांनुसार, महिलेने आऱोप लावला आहे की, ती एका लॉजमध्ये थांबली होती. जिथे तीन लोकांनी तिला नशेचा पदार्थ देऊन तिच्यावर सामूहिक बलात्कार केला.
पीडित मॉडलने तक्रार केली की, आरोपींनी एक डिसेंबर ते तीन डिसेंबरपर्यंत तिच्यावर बलात्कार केला. आरोपींनी या घटनेचा व्हिडीओ देखील बनवला आणि पीडितेला ब्लॅकमेल करण्यासाठी वापरला. त्यांनी तिला हा व्हिडीओ लीक करण्याची धमकी देऊन तिच्यावर पुन्हा बलात्कार केला.
पोलिसांनी सांगितलं की, आरोपी सलीम कुमारला अटक करण्यात आली आहे आणि दोन आरोपी अजमल आणि शमीर यांचा शोध घेतला जात आहे. पोलिसांनी सांगितलं की मलप्पुरम येथे राहणारी पीडिताने तक्रारी म्हटलं की, ती इथे फोटोशूटसाठी आली होती.
मॉडल अलप्पुझा येथील रहवाशी कुमारला आधीपासून ओळखत होती. त्यामुळे त्याने महिलेच्या राहण्यासाठी लॉजवर व्यवस्था केली होती. पण नंतर लॉजच्या मालकासोबत मिळून तिन्ही आरोपींनी तिला नशेचा पदार्थ मिश्रित करून पेय दिलं होतं आणि त्यानंतर तिच्यावर सामूहिक बलत्कार केला. त्यांनी सांगितलं की, इंफोपार्क पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल करून घेतला आणि ते इतर आरोपींचा शोध घेत आहेत.