‘त्या’ फोटोंमुळे मॉडेल दिव्या पाहुजाची हत्या!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 5, 2024 08:34 IST2024-01-05T08:33:39+5:302024-01-05T08:34:42+5:30

दिव्या पाहुजाकडे अभिजित सिंगचे काही अश्लील फोटो होते, ज्याच्या मदतीने ती आरोपी अभिजितला ब्लॅकमेल करत होती. ती अनेकदा अभिजित सिंगकडून खर्चासाठी पैसे घेत असे आणि आता तिला मोठी रक्कम उकळायची होती.

Model Divya Pahuja was killed because of 'those' photos | ‘त्या’ फोटोंमुळे मॉडेल दिव्या पाहुजाची हत्या!

‘त्या’ फोटोंमुळे मॉडेल दिव्या पाहुजाची हत्या!

गुरुग्राम : येथे एका हॉटेलमध्ये २७ वर्षीय मॉडेल दिव्या पाहुजाची गोळ्या झाडून हत्या करण्यात आल्याची घटना समोर आल्यानंतर या प्रकरणी पोलिसांनी नवीन खुलासा केला आहे. 

दिव्या पाहुजाकडे अभिजित सिंगचे काही अश्लील फोटो होते, ज्याच्या मदतीने ती आरोपी अभिजितला ब्लॅकमेल करत होती. ती अनेकदा अभिजित सिंगकडून खर्चासाठी पैसे घेत असे आणि आता तिला मोठी रक्कम उकळायची होती.

२ जानेवारीला अभिजित सिंह हा दिव्या पाहुजासोबत हॉटेल सिटी पॉइंटवर पोहोचला. येथे त्याने तिच्या फोनमधून अश्लील फोटो डिलीट करण्यासाठी तिचा फोन घेतला. मात्र, तिने  फोनचा पासवर्ड सांगितला नाही. याचा राग आल्याने त्याने दिव्यावर गोळी झाडली, असा खुलासा आरोपीने पोलिसांकडे केला आहे. हत्या केल्यानंतर आरोपींनी तिचा मृतदेह बीएमडब्ल्यू कारमध्ये ठेवला होता.

Web Title: Model Divya Pahuja was killed because of 'those' photos