मोबाईल चोरट्यांचा पाठलाग करणं पडलं महागात; डॉक्टरने गमावला पाय
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 6, 2019 16:20 IST2019-04-06T16:19:01+5:302019-04-06T16:20:29+5:30
मोहम्मद मोईन खान आणि मोहम्मद फरान मोहम्मज नसीम खान अशी अटक दोघांची नावे आहेत.

मोबाईल चोरट्यांचा पाठलाग करणं पडलं महागात; डॉक्टरने गमावला पाय
मुंबई - लोकलने प्रवास करताना डॉक्टरचा मोबाईल हिसकावून पळालेल्या चोरट्यांचा पाठलाग करताना एका डॉक्टरला आपला पाय गमवावा लागला आहे. याप्रकरणी दोन्ही मोबाईलचोरांना वडाळा पोलिसानी बेड्या ठोकल्या आहेत. मोहम्मद मोईन खान आणि मोहम्मद फरान मोहम्मज नसीम खान अशी अटक दोघांची नावे आहेत.
डॉ. मेहबुब अली खान असे जखमी डॉक्टरचे नाव आहे. डॉ. मेहबुब अली खान हे होमिओपॅथिक डॉक्टर आहेत. ते ट्रॉम्बे चित्ता कॅम्प परिसरात राहतात. २९ मार्च रोजी ते मानखुर्द ते सॅन्डहर्स्ट रोड असा हार्बर मार्गावरील लोकलने प्रवास करत होते. दुपारी अडीज वाजताच्या सुमारास रे रोड स्थानकावर येताच त्यांच्या हातातील मोबाईल एका चोरट्याने हिसकावला. त्याने तो दुसऱ्याकडे देत पळ काढला. त्यानंतर खान यांनी दोघांचा पाठलाग सुरु केला. मात्र, त्यावेळी लोकलची धडक लागून ते जखमी झाले. त्यात त्यांना पाय गमवावा लागला. याप्रकरणी वडाळा लोहमार्ग पोलिसांनी गुन्हा नोंदवला असून दोघांना अटक केली.