लोकलमध्ये मोबाइल चोरणारे जेरबंद, १८ मोबाइल केले हस्तगत
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 1, 2018 15:26 IST2018-09-01T15:25:22+5:302018-09-01T15:26:22+5:30
त्यांच्याकडून ठाणे शहर आणि मुंबई हद्दीतील आणि कुर्ला ते मुंब्रा लोकल प्रवासातील १८ मोबाइल हस्तगत केल्याची माहिती मुंब्रा पोलिसांनी दिली आहे.

लोकलमध्ये मोबाइल चोरणारे जेरबंद, १८ मोबाइल केले हस्तगत
ठाणे - मोबाइल चोरी करणाऱ्या सराईत दुकलीला मुंब्रा पोलिसांनी जेरबंद करत त्यांच्याकडून विविध कंपनीचे एकूण 18 मोबाइल हस्तगत केले आहेत. हस्तगत केलेल्या मोबाइलची किंमत 2 लाख 40 हजार रुपये आहे. मोहम्मद शेख उर्फ चावला (वय २१) आणि परवेज कुरेशी (वय - २१) अशी अटक केलेल्या दुकलीची नावे आहेत. हे दोघेही मुंब्य्रातील राहणारे आहेत. खासकरून हे दोघे कुर्ला ते मुंब्रा रेल्वे स्थानकादरम्यान लोकलमधील प्रवाश्यांचे मोबाइल चोऱ्या करीत असत. त्यांच्याकडून ठाणे शहर आणि मुंबई हद्दीतील आणि कुर्ला ते मुंब्रा लोकल प्रवासातील १८ मोबाइल हस्तगत केल्याची माहिती मुंब्रा पोलिसांनी दिली आहे.