चोरट्यांनी महिलेचा फोन चोरला अन् तिला रस्त्याने फरफटत नेले, पाहा धक्कादायक VIDEO

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 17, 2021 17:57 IST2021-12-17T17:55:14+5:302021-12-17T17:57:13+5:30

पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे एका चोराला अटक केली असून, दुसऱ्या आरोपीचा शोध सुरू आहे.

A mobile snatching incident reported in the Shalimar Bagh area of delhi | चोरट्यांनी महिलेचा फोन चोरला अन् तिला रस्त्याने फरफटत नेले, पाहा धक्कादायक VIDEO

चोरट्यांनी महिलेचा फोन चोरला अन् तिला रस्त्याने फरफटत नेले, पाहा धक्कादायक VIDEO

नवी दिल्ली:दिल्लीतील शालीमार बाग परिसरातील फोर्टिस हॉस्पिटलजवळ एका महिलेचा मोबाईल हिसकावून तिला शंभर मीटर फरफटत नेल्याची धक्कादायक घटना घडली आहे. महिला हॉस्पिटलमध्ये नर्स म्हणून काम करते, गुरुवारी सायंकाळी ड्यूटी संपवून घरी जात असताना दोन बाईकस्वारांनी तिच्या हातून मोबाईल हिसकावला आणि ओढत नेले. संपूर्ण घटना कॅमेऱ्यात कैद झाली. याप्रकरणी पोलिसांनी एका आरोपीला अटक केली आहे.

व्हिडिओत काय दिसत आहे ?
महिला रस्त्याने जात असताना दोन बाईकस्वार चोरांनी महिलेच्या हातून मोबाईल हिसकावण्याचा प्रयत्न केला. यावेळी महिलेने मोबाईल परत घेण्यासाठी त्यांचा पाठलाग केला आणि गाडीला लटकली. यानंतर पकडले जाऊ या भीतीने त्या चोरांनी तशीच गाडी सुरू ठेवली आणि महिलेला काही अंतरापर्यंत फरफटत नेले. यादरम्यान महिलेचा हात सुटला आणि महिला रस्त्यावर पडली. दोघे चोर पळून गेले, 

आरोपी अटकेत
या घटनेत महिलेला दुखापत झाली, पण उपचारानंतर तिला रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे चोरट्याची ओळख पटवली आणि एकाला अटक केली. त्याच्या ताब्यातून गुन्ह्यात वापरलेली स्कूटी जप्त करण्यात आली आहे. दरम्यान, दुसऱ्या आरोपीचा शोध सुरू आहे. 

Web Title: A mobile snatching incident reported in the Shalimar Bagh area of delhi