लोकलमध्ये हातावर फटका मारून मोबाईल चोरणारा अटकेत
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 25, 2019 19:19 IST2019-10-25T19:16:16+5:302019-10-25T19:19:16+5:30
त्याच्याकडून एक लॅपटॉप, लॅपटॉप बॅग, लॅपटॉप चार्जर, पाच मोबाईल असा १ लाख २६ हजार ६८० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.

लोकलमध्ये हातावर फटका मारून मोबाईल चोरणारा अटकेत
मुंबई - रेल्वे फलाटावर उभे राहून असलेल्या प्रवाशांच्या हातावर फटका मारून, त्यांच्या हातातील मोबाईल पडून तो चोरणाऱ्याच्या वडाळा रेल्वेपोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. नूरइस्लाम जहांगीर शेख (२०) असं त्याचं नाव आहे.
२० ऑक्टोबरला माहिम रेल्वे स्थानकातील फलाट क्रमांक ६ वर सकाळी जितेंद्र चव्हाण लोकलच्या दरवाज्यात उभे राहून फोनवर बोल्ट होते. लोकल पुन्हा सुरु झाली असतानाच फलाटावर उभ्या असलेल्या एका इसमाने त्यांच्या हातावर फटका मारला. त्यांचा मोबाईल खाली पाडला. घटना घडली तेव्हा लोकलचा वेग जास्त नसल्याने जितेंद्र यांनी धावत्या लोकलमधून उतरून इतर रेल्वे प्रवाशांच्या मदतीने चोराला पकडले. पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर तो चोर रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार असल्याचे लक्षात येताच त्याची सखोल चौकशी केली. तेव्हा त्याने तीन गुन्ह्यांची कबुली दिली.
त्याच्याकडून एक लॅपटॉप, लॅपटॉप बॅग, लॅपटॉप चार्जर, पाच मोबाईल असा १ लाख २६ हजार ६८० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. अधिक चौकशीcr सुरु असल्याची माहिती वडाळा रेल्वे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पाल यांनी सांगितले.