शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

मोबाईल चोरणाऱ्या १९ जणांच्या टोळी जेरबंद : सव्वा सात लाखांचे ८२ हँडसेट जप्त 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 13, 2019 21:03 IST

विसर्जन मिरवणुकीत मंडळांची आरास पाहण्यासाठी जमलेल्या नागरिकांचे मोबाईल चोरणाऱ्या टोळीला गुन्हे शाखेच्या युनिट २ च्या पथकाने जेरबंद केले आहे़.

पुणे : विसर्जन मिरवणुकीत गर्दीचा फायदा घेऊन मंडळांची आरास पाहण्यासाठी जमलेल्या नागरिकांचे मोबाईल चोरणाऱ्या टोळीला गुन्हे शाखेच्या युनिट २ च्या पथकाने जेरबंद केले आहे़. या टोळीतील तब्बल १९ जणांना ताब्यात घेण्यात आले आहे़. त्यांच्याकडून ७ लाख १९ हजार रुपयांचे ८२ हँडसेट जप्त करण्यात आले आहे़. अटक मालेगाव व नांदेड परिसरातील असल्याचे पोलिसांनी सांगितले़. यावेळी फरासखाना पोलिस ठाण्यात ५ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत़. विसर्जन मिरवणुकीच्या कालावधीत होणारी चोऱ्या रोखण्यासाठी यंदा पोलिसांच्या वतीने खास तयारी करण्यात आली होती. यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाबरोबरच साध्या वेशातील पोलिसांची पथके देखील गर्दीत तैनात होती.  गुन्हे शाखेचे निरीक्षक गजानन पवार  व त्यांचे पथक गस्त घालत असताना ढेंगळे पुलाच्या खाली नदीपात्रात ४ जण संशयास्पदरित्या उभे असल्याचे त्यांनी पाहिले़ त्यांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता, नांदेड व मालेगाव येथून गणपती पाहण्यासाठी आल्याचे सांगितले. त्यांची अंगझडती घेतली असता त्यांच्याकडे १८ मोबाईल मिळून आले. मात्र मोबाईलच्या बाबतीत विचारणा केली तेव्हा त्यांनी समाधानकारक उत्तर दिले नाही. त्यामुळे त्यांना ताब्यात घेऊन कसून चौकशी केली त्यावेळी त्यांनी ते मोबाईल दगडूशेठ हलवाई मंदीराजवळ गदीर्चा फायदा घेत भाविकांचे चोरल्याचे कबूल केले. तसेच त्यांचे १४ ते १५ साथीदार चोऱ्या करण्यासाठी मिरवणूकीत आले असून, विविध भागात ग्रुप करुन ते चोऱ्या करत असल्याची माहिती दिली. त्यानुसार पोलिसांनी तपासाची सुत्रे गतिमान करत तात्काळ रेल्वे स्टेशन दर्गा, मालधक्का जवळील रेल्वे हॉस्पिटल, ठुबे पार्क, शिवाजीनगर येथून इतर १५ जणांना ताब्यात घेतले. यावेळी त्यांच्याकडून देखील विविध कंपन्यांचे ७४ मोबाईल फोन जप्त करण्यात आले.

ही कामगिरी गुन्हे शाखेचे उपायुक्त बच्चन सिंह, सहाय्यक पोलिस आयुक्त डॉ. शिवाजी पवार, यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक गजानन पवार, कर्मचारी यशवंत आंब्रे, संजय दळवी,अनिल ऊसुलकर, दिनेश गंडाकुश, अस्लम पठाण, अतुल गायकवाड, विशाल भिलारे यांच्या पथकाने केली.़़़़़़़विसर्जन मिरवणूक सुरू झाल्यापासून  शुक्रवारी सायंकाळपर्यंत विश्रामबाग पोलिस ठाण्यात मोबाईल चोरीचे ३ तर फरासखाना पोलिसा ठाण्याच्या हद्दीत मोबाईल चोरीसह इतर १२ गुन्हे दाखल झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

टॅग्स :PuneपुणेCrime Newsगुन्हेगारीGanesh Visarjanगणेश विसर्जनGanesh Mahotsavगणेशोत्सवtheftचोरीThiefचोरPoliceपोलिस