मस्करी केल्याच्या रागातून तरुणाला मारहाण
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 28, 2018 17:06 IST2018-10-28T17:04:48+5:302018-10-28T17:06:53+5:30
मस्करी केल्याचा राग मनात धरून तरुणाला सिमेंट ब्लॉकने बेदम मारहाण करण्यात आली. ही घटना शनिवारी सायंकाळी सव्वासहाच्या सुमारास मोशीतील सुनीलनगर येथे घडली.

मस्करी केल्याच्या रागातून तरुणाला मारहाण
पिंपरी : मस्करी केल्याचा राग मनात धरून तरुणाला सिमेंट ब्लॉकने बेदम मारहाण करण्यात आली. ही घटना शनिवारी सायंकाळी सव्वासहाच्या सुमारास मोशीतील सुनीलनगर येथे घडली.
सचिन मोहिते व त्याच्या तीन मित्रांवर गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणी संतोष भानुदास जांभूळकर (वय २७, रा. गुलाब पोतेकर फार्महाऊस, पाईट, ता. खेड, जि. पुणे) यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेली माहिती अशी, जांभूळकर यांनी सचिन मोहिते याची मस्करी केली होती. याचा राग मनात धरून मोहिते व त्याच्या तीन मित्रांनी जांभूळकर यांना सुनीलनगर येथील आर्य सुपर मार्केटसमोर शिवीगाळ करीत हाताने मारहाण केली. दरम्यान, मोहिते याने सिमेंटचे ब्लॉक मारल्याने ते गंभीर जखमी झाले. तसेच पोलिसात तक्रार केल्यास तुझ्याकडे बघून घेऊ अशी धमकी दिली. याप्रकरणी एमआयडीसी भोसरी ठाण्यात गुन्हा दाखल आहे.