शहरं
Join us  
Trending Stories
1
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
2
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू
3
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
4
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
5
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
6
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
7
साताऱ्यात वातावरण तापणार; शनिवार-रविवारची सुटी हेरून गुन्हा दाखल केल्याची एपीएमसीत चर्चा
8
“आईचे निधन पण मोदी तातडीने देशसेवेत, आईच्या पदराखाली राहून राजकारण करणारा नको”: CM शिंदे
9
KL Rahul ची रेकॉर्ड ब्रेकींग खेळी! राजस्थान रॉयल्ससमोर उभे केले तगडे आव्हान 
10
चार दिवसांपासून उत्तराखंडचे जंगल धुमसतेय; सैन्याच्या छावणीपर्यंत पोहोचला वणवा, हेलिकॉप्टर उडाली
11
ट्रोलिंग केल्यास, दोन महिने थेट तुरूंगात टाका! महेश मांजरेकरांचा सरकारला सल्ला
12
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर
13
शशिकांत शिंदेंना अटक झाली तर महाराष्ट्रात संघर्ष करू; शरद पवार यांचा इशारा
14
माझा 'भाव' विचारला, महिलांचा अपमान केला, मी श्वास घेते हेही काँग्रेसला त्रासदायक; कंगना भावूक
15
राहुल गांधी रामललाचे दर्शन घेणार? “लोकसभा निवडणुकांमुळे राम मंदिर आठवले”; भाजपाची टीका
16
“महाराष्ट्र काँग्रेस ठाकरे गटात विलीन झाल्यास आश्चर्य वाटायला नको”; संजय निरुपम यांची टीका
17
Ohh Shit! रोहित शर्माने धाव पूर्ण होताच रिषभ पंतला मारला जोरात धक्का अन्... 
18
रिषभ पंतवर मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्या खवळला, अम्पायरकडे तक्रार करताना दिसला
19
“PM मोदींनी शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय घेतले, काँग्रेसने फक्त चॉकलेट दाखवले”; फडणवीसांची टीका
20
"हमासच्या दहशतवाद्याने अंगठी देऊन मला प्रपोज केलं अन् म्हणाला..."; तरूणीने सांगितला भयानक किस्सा

182 महिलांसोबत शरीरसंबंध ठेवून MMS बनविले; बड्या उद्योगपती घराण्यातील दोघांना अटक

By ऑनलाइन लोकमत | Published: January 30, 2020 10:28 PM

या प्रकरणात या दोन्ही उद्योगपतींच्या घरातील सामिल मुलांसह नोकरालाही अटक करण्यात आली आहे.

ठळक मुद्देगेल्या अनेक वर्षांपासून ही दोन मुले हे रॅकेट चालवत होते. त्याच्यांकडे १८२ महिलांच्या सेक्स क्लिप (एमएमएस) सापडले आहेत.सध्या पोलिसांनी लॅपटॉप आणि त्यामधील सेक्स क्लिप्स हस्तगत केल्या असून पुढील तपासासाठी लॅपटॉपला फॉरेन्सिक लॅबमध्ये पाठवण्यात आले आहे.

कोलकाता - कोलाकातामध्ये एक सेक्स रॅकेटसारखा धक्कादायक प्रकार उघडकीस आली आहे. बुधवारी दोन उद्योगपतींच्या मुलांना सेक्स ब्लॅकमेल रॅकेट चालवल्याच्या गुन्ह्याखाली अटक करण्यात आली आहे. या दोघांवर महिलांसोबत शारीरिक संबंध ठेवून त्याच्या सेक्स क्लिप म्हणजेच एमएमएस बनवल्याचा आरोप आहे. या एमएमएसच्या सहाय्याने पीडित महिलांकडून पैसे उकळण्याचा धंदा या दोघांनी सुरु केला होता. या प्रकरणात या दोन्ही उद्योगपतींच्या घरातील सामिल मुलांसह नोकरालाही अटक करण्यात आली आहे.पोलिसांनी टाईम्स ऑफ इंडियाला दिलेल्या माहितीनुसार गेल्या अनेक वर्षांपासून ही दोन मुले हे रॅकेट चालवत होते. त्याच्यांकडे १८२ महिलांच्या सेक्स क्लिप (एमएमएस) सापडले आहेत. तीन महिने केलेल्या तपासानंतर पोलिसांनी आदित्य अग्रवाल आणि अनीश लोहारूका यांना अटक केली आहे. दोघांचे वय २० वर्ष असून त्यांना मदत करणाऱ्या कैलाश यादव नावाच्या नोकराला देखील अटक करण्यात आली आहे.या प्रकरणाच्या तपासात पोलिसांनी दोन मुख्य आरोपींनी महिलांशी मैत्री करत त्यांच्याशी शारिरीक संबंध ठेवल्याचे कबुल केले. आदित्य आणि अनीश वेगवेगळ्या महिलांसोबत मैत्री करत त्यानंतर प्रेमाच्या जाळ्यात ओढून त्यांना आपल्या घरी किंवा हॉटेलवर भेटायला बोलवत. तेथेच कॅमेरा लपवून या महिलांसोबत शारिरीक संबंध ठेवल्याचे चित्रीकरण करून करत. त्यानंतर रेकॉर्ड केलेले हे व्हिडीओ आपल्या लॅपटॉपमध्ये ठेवत. काही दिवसांनंतर हेच व्हिडीओ दाखवून महिलांना ब्लॅकमेल करत त्यांच्याकडून पैसे उकळत असत. अशी या आरोपींची मोडस ऑपरेंडी होती. 

आदित्य अग्रवाल हा कोलाकातामधील सर्वात मोठे कपड्यांचे दुकान असलेल्या व्यवसायिकाच्या घरातील आहे. तर, अनीश लोहारूकाच्या वडिलांचा रिअल इस्टेट आणि हॉटेल व्यवसाय आहे. तिन्ही आरोपींना ६ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडीत सुनावली आहे. लोहारूका कुटुंबातील एका व्यक्तीने टाईम्स ऑफ इंडियाला दिलेल्या माहितीत अनीशला या सगळ्यात त्याला गुंतवल्याचे जात असल्याचे सांगितले. त्यानंतर त्यांनी कॉल डिस्कनेक्ट केला. टाईम्स ऑफ इंडियाने व्हॉट्स अॅप देखील मेसेज केला. मात्र त्याला कुटुंबीयांनी उत्तर दिले नाही. तसेच एका महिलेने या दोघांवर १० लाख रुपयांसाठी ब्लॅकमेल केल्याचा आरोप केला आहे.पोलीसांनी अनिशचा लॅपटॉप जप्त केल्यानंतर त्यात १८२ सेक्स क्लिपचे फोल्डर आढळून आले. प्रत्येक फोल्डरमध्ये महिलेचे नाव देण्यात आले होते. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार यात २०१३ पासूनचे एमएमएस क्लिप आहेत. सध्या पोलिसांनी लॅपटॉप आणि त्यामधील सेक्स क्लिप्स हस्तगत केल्या असून पुढील तपासासाठी लॅपटॉपला फॉरेन्सिक लॅबमध्ये पाठवण्यात आले आहे.

टॅग्स :Sex Racketसेक्स रॅकेटbusinessव्यवसायArrestअटकPoliceपोलिस