एमएमआरडीएचा अधिकारी २४ हजारांची लाच घेताना जेरबंद; लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई
By जितेंद्र कालेकर | Updated: September 1, 2022 22:09 IST2022-09-01T22:03:36+5:302022-09-01T22:09:52+5:30
यातील तक्रारदारांच्या परिचयाच्या दोन व्यक्तींच्या जमिनीचा झोन दाखला देण्यासाठी प्रत्येकी १२ हजारांप्रमाणे २४ हजारांच्या रकमेची ३० ऑगस्ट २०२२ रोजी मागणी केल्याचे उघड झाले होते.

एमएमआरडीएचा अधिकारी २४ हजारांची लाच घेताना जेरबंद; लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई
ठाणे: जमिनीचा झोन दाखला देण्यासाठी २४ हजारांची लाच घेणाऱ्या मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचा (एमएमआरडीए) उपनियोजक शिवराज पवार, याला ठाणेलाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) पथकाने गुरुवारी रंगेहाथ अटक केली. त्याच्याविरुद्ध वर्तकनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यातील तक्रारदारांच्या परिचयाच्या दोन व्यक्तींच्या जमिनीचा झोन दाखला देण्यासाठी प्रत्येकी १२ हजारांप्रमाणे २४ हजारांच्या रकमेची ३० ऑगस्ट २०२२ रोजी मागणी केल्याचे उघड झाले होते. त्याच आधारे एसीबीचे ठाण्याचे अपर अधीक्षक अनिल घेरडीकर यांच्या पथकाने १ सप्टेंबर रोजी दुपारी ३.३० वाजण्याच्या सुमारास सापळा लावला. तक्रारदाराकडून २४ हजारांची लाच स्वीकारतांना एमएमआरडीएच्या ठाण्यातील कार्यालयात पवार याला रंगेहाथ पकडण्यात आले. त्याला ताब्यात घेण्यात आले असून लाचलुचपत प्रतिबंधक कायद्याखाली गुन्हा दाखल केला.