वीज कंपनीच्या अभियंत्यास आमदारांनी दोरीने बांधले; आमदार मंगेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात

By ऑनलाइन लोकमत | Published: March 26, 2021 07:36 PM2021-03-26T19:36:57+5:302021-03-26T19:38:15+5:30

MLA Mangesh Chavan detains by Police : या प्रकरणी आमदार मंगेश चव्हाण यांना जिल्हाधिकारी कार्यालयातून पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

The MLA tied the engineers of the power company with ropes; MLA Mangesh Chavan detain by police | वीज कंपनीच्या अभियंत्यास आमदारांनी दोरीने बांधले; आमदार मंगेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात

वीज कंपनीच्या अभियंत्यास आमदारांनी दोरीने बांधले; आमदार मंगेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात

googlenewsNext
ठळक मुद्दे घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलीस अधीक्षक डाॅ.प्रवीण मुंडे यांनी स्वत: जिल्हाधिकारी कार्यालयात येत आमदार मंगेश चव्हाण यांच्यासह काही आंदोलकांना ताब्यात घेतले.

जळगाव : शेतक-यांचे वीज कनेक्शन कट केल्याच्या कारणावरून आमदार मंगेश चव्हाण यांच्यासह आंदोलकांनी वीज कंपनीचे अभियंता फारूख शेख यांना दोरीने बांधले. या प्रकरणी आमदार मंगेश चव्हाण यांना जिल्हाधिकारी कार्यालयातून पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.


चाळीसगाव तालुक्यातील शेतक-यांचा वीज पुरवठा खंडीत केल्याच्या कारणावरून आमदार मंगेश चव्हाण यांच्यासह शेतक-यांनी शुक्रवारी दुपारी वीज कंपनीच्या कार्यालयात आले. यावेळी आमदार चव्हाण यांच्यासह आंदोलकांनी वीज कंपनीच्या अभियंत्यांना दोरीने बांधून ठेवले. त्यानंतर आमदारासह आंदोलक जिल्हाधिकारी कार्यालयात आले. या प्रकरणी वीज कंपनीच्या अभियंत्यांनी पोलिसात तक्रार दिली. घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलीस अधीक्षक डाॅ.प्रवीण मुंडे यांनी स्वत: जिल्हाधिकारी कार्यालयात येत आमदार मंगेश चव्हाण यांच्यासह काही आंदोलकांना ताब्यात घेतले.

महावितरणच्या अधिका-यांनी काही शेतक-यांचे वीज कनेक्शन  कट केल्याच्या कारणावरून वीज कंपनीच्या अभियंत्यांना दोरीने बांधल्याची तक्रार प्राप्त झाली आहे. पोलिसात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे. या प्रकरणी संशयितांना ताब्यात घेतले आहे. -डाॅ.प्रवीण मुंडे, पोलीस अधीक्षक, जळगाव.

Web Title: The MLA tied the engineers of the power company with ropes; MLA Mangesh Chavan detain by police

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.