आमदार संदीप क्षीरसागर यांच्यावर दु:खाचा डोंगर; मामांचा कार अपघातात मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2023 21:03 IST2023-02-11T21:02:46+5:302023-02-11T21:03:21+5:30
अपघात रस्त्यावर उभ्या असणाऱ्या गाडीला वाचवताना घडला असल्याची माहिती समोर येत आहे.

आमदार संदीप क्षीरसागर यांच्यावर दु:खाचा डोंगर; मामांचा कार अपघातात मृत्यू
राष्ट्रवादीचे बीडचे आमदार संदीप क्षीरसागर यांच्या मामांचा अपघाती मृत्यू झाला आहे. माणिक रायजादे असे त्यांचे नाव आहे.
गढी नजीक कार अपघातात माणिक रायजादे यांचा मृत्यू झाला आहे. सोलापूर-धुळे राष्ट्रीय महामार्गावर दुपारच्या सुमारास भरघाव वेगात असलेल्या कारवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला आहे. या अपघातात ब्रेजा कारने चार ते पाच पलट्या घेतल्या असल्याची प्राथमिक माहिती आहे.
हा अपघात रस्त्यावर उभ्या असणाऱ्या गाडीला वाचवताना घडला असल्याची माहिती समोर येत आहे. रायजादे यांच्या मृतदेहाची बीड जिल्हा रुग्णालयात उत्तरीय तपासणी करून मृतदेह सिन्नरकडे पाठविण्यात आला आहे.