मोठी बातमी! राज बब्बर यांना एमएलए न्यायालयाने सुनावली २ वर्षांची शिक्षा आणि दंड
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 7, 2022 18:46 IST2022-07-07T18:20:08+5:302022-07-07T18:46:05+5:30
Raj Babbar : राज बब्बर यांना सरकारी कामात अडथळा आणणे आणि मारहाण केल्याप्रकरणी दोषी ठरवण्यात आले आहे.

मोठी बातमी! राज बब्बर यांना एमएलए न्यायालयाने सुनावली २ वर्षांची शिक्षा आणि दंड
लखनौ : चित्रपट अभिनेते आणि काँग्रेस नेते राज बब्बर यांना मध्य प्रदेशच्या एमएलए न्यायालयाने दोन वर्षांच्या तुरुंगवासासह 8500 रुपयांच्या दंडाची शिक्षा सुनावली आहे. राज बब्बर यांना सरकारी कामात अडथळा आणणे आणि मारहाण केल्याप्रकरणी दोषी ठरवण्यात आले आहे.
कोर्ट निकाल सुनावताना राज बब्बर न्यायालयात हजर होते. 2 मे 1996 रोजी मतदान अधिकाऱ्याने वजीरगंजमध्ये एफआयआर दाखल केला होता. तेथून राज बब्बर हे समाजवादी पक्षाचे उमेदवार होते. त्यादरम्यान मतदान अधिकाऱ्याला मारहाण केल्याची घटना घडली होती.