शहरं
Join us  
Trending Stories
1
“भाजपाला पराभव दिसू लागलाय, प्रचंड मताधिक्यांनी १०० टक्के विजयी होणार”: विशाल पाटील
2
‘मुलीला वडिलांच्या संपत्तीत ५० टक्के अधिकार, हा सरकारचा कायदा’, सुप्रिया सुळेंचा जानकरांना टोला 
3
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
4
अजितदादांचे पुत्र जय पवारांनी घेतली मनोज जरांगेंची भेट; कारण गुलदस्त्यात, चर्चांना उधाण
5
चोरीच्या आरोपाखाली महिलेला दिली थर्ड डिग्री, पोलिसांवर गुन्हा दाखल 
6
'राणेंचा प्रचार करायला लागतोय यातच राज ठाकरेंचा विजय'; काँग्रेस नेत्याची बोचरी टीका
7
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
8
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
9
PHOTOS: अभिनेत्रींना मात देणारी 'अधिकारी'! राजकारणात आवड, चित्रपटांची ऑफर पण...
10
धक्कादायक! कोविड सारख्या 'या' गंभीर आजारामुळे हजारो 'श्वान' मरणाच्या दारात!
11
बजरंग पूनियावर NADAची मोठी कारवाई, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचं स्वप्न भंगणार?
12
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका
13
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
14
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
15
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
16
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट
17
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
18
"मुलांशी बोलू नकोस", भावाचा सल्ला अन् बहीण संतापली; १४ वर्षीय तरूणीने केली हत्या
19
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
20
राहुल आणि सिद्धरामय्या यांचा कार्टून व्हिडिओ; काँग्रेसची जेपी नड्डांसह तीन BJP नेत्यांविरुद्ध तक्रार

बलात्कार प्रकरणातील आरोपी आमदाराला पाहिजे पीडितेचा जन्मदाखला

By ऑनलाइन लोकमत | Published: August 29, 2019 8:15 PM

पीडिता मुलगी ही अल्पवयीन नाही असा त्यांचा दावा असून गुरूवारो सोमवारी सत्र न्यायालयात त्यांच्या वकिलांनी तसे स्पष्ट केले. 

ठळक मुद्देमोंसेरात यांच्याविरुद्ध या प्रकरणात गुन्हा नोंदविण्यात आला त्यावेळी ती मुलगी अल्पवयीन असल्याचा उल्लेख करण्यात आला होता. पीडितेच्या वयासंबंधी अनिश्चीतता निर्माण झाली होती तेव्हा तिचे वय तपासम्यासाठी वैद्यकीय चाचणीही करण्यात आली होती.

पणजी - अल्पवयीन मुलीवरील बलात्कार प्रकरणात अडकलेले भाजप आमदार बाबूश मोंसेरात यांना बलात्कार पीडितेचा जन्मदाखला पाहिजे आहे. पीडिता मुलगी ही अल्पवयीन नाही असा त्यांचा दावा असून गुरूवारो सोमवारी सत्र न्यायालयात त्यांच्या वकिलांनी तसे स्पष्ट केले. पीडित मुलीच्या आईने अपना घरमध्ये दिलेल्या मुलीच्या  जन्मदाखल्यानुसार ती अल्पवयीन नसल्याचे मोंसेरात यांच्या वकिलांचे म्हणणे आहे. मोंसेरात यांच्याविरुद्ध या प्रकरणात गुन्हा नोंदविण्यात आला. त्यावेळी ती मुलगी अल्पवयीन असल्याचा उल्लेख करण्यात आला होता. पीडितेच्या वयासंबंधी अनिश्चीतता निर्माण झाली होती तेव्हा तिचे वय तपासम्यासाठी वैद्यकीय चाचणीही करण्यात आली होती. या चाचणीच्यावेळी तिचे वय १८ वर्षे वयापेक्षा कमी असल्याचे म्हटले होते. त्यामुळे कायद्याने तिला अल्पवयीन ठरविले होते. २०१६ सालच्या या प्रकरणात मोन्सेरात यांना अल्पवयीन मुलीच्या तक्रारीनंतर अटक करण्यात आली होती. मुलीला गुंगीचे पेय प्यायला देऊन तिच्यावर बलात्कार करण्यात आल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला होता.  या प्रकरणात तिच्या आईचाही सहभाग असल्याच्या कारणावरून तिलाही अटक करण्यात आली होती. त्यामुळे मुलीला अपना घरात ठेवण्यात आले होते.या प्रकरणात तपास करून पोलिसांनी आरोपपत्र दाखल केले होते.  १२ जून रोजी पणजी अतिरिक्त सत्र न्यायालयात आरोप निश्चित करण्याचा आदेश सत्र न्यायायाने ३ जून रोजी दिला होता. गुरूवारी त्यांच्यावर आरोप निश्चित केले जाणार होते, परंतु पीडितेच्या जन्मदाखल्याचा नवीन मुद्दा उपस्थित केल्यामुळे आता पुढची तारीख देण्यात आली आहे. १९ सप्टेंबरपूर्वी पोलिसांना या प्रकरणात स्पष्टीकरण देण्याचा आदेश न्यायालयाने दिला आहे.

टॅग्स :Rapeबलात्कारPoliceपोलिसCourtन्यायालयMLAआमदारBJPभाजपा