शहरं
Join us  
Trending Stories
1
Priyanka Gandhi : "माझ्या भावाला राजपुत्र म्हणतात...; नरेंद्र मोदी हे सम्राट, महालात राहतात", प्रियंका गांधी कडाडल्या
2
रोहित शर्माचे काल प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणे ही भारतासाठी डोकेदुखी; MI ने सांगितलं टेंशन वाढवणारं कारण
3
"अरविंद केजरीवालांनी वाराणसीतून नरेंद्र मोदींच्या विरोधात निवडणूक लढवावी"; सपा नेत्याची मागणी
4
मला धमक्या देऊ नका, मी मनात आणलं तर..., नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
5
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
6
IPL 2024 मधील दोन भारतीय स्टार गोलंदाज स्पर्धेत आता पुढे कदाचित नाही खेळू शकणार 
7
NSE Share : एकावर ४ बोनस शेअर्स, ९०००% डिविडंड; 'या' एक्सचेंजनं गुंतवणूकदारांना दिलं डबल गिफ्ट
8
"हार्दिक पांड्याबद्दल आदर दिसत नाही", इरफान पठाणकडून MI च्या कॅप्टनची बिनपाण्याने धुलाई
9
सलमान खान फायरिंग प्रकरणात आत्महत्या करणाऱ्या आरोपीच्या कुटुंबाची मुंबई उच्च न्यायालयात धाव, सीबीआय चौकशीची मागणी
10
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
11
रोहित शर्माबद्दल 'ती' अफवा पसरवली; आकाश चोप्रा भडकला, दिली संतप्त प्रतिक्रिया
12
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
13
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली
14
शुबमनने हरलीनला दिले क्रिकेटचे धडे; महिला क्रिकेटपटूसाठी गिल बनला कोच, Video
15
दुबईहून कपड्यात लपवून आणलं २५ किलो सोनं; अफगाणिस्तानच्या बड्या अधिकाऱ्याला पकडलं
16
Income Tax नियमांमध्ये बदल होणार आहेत का? शेअर बाजारही आपटला; अर्थमंत्र्यांनी दिली प्रतिक्रिया
17
T20 World Cup साठी अमेरिकेचा संघ जाहीर; भारताच्या विश्वविजेत्या कर्णधाराला डच्चू
18
एल्विश यादव पुन्हा अडचणीत! सापाचं विष प्रकरणानंतर आता मनी लॉड्रिंग केस, ED करणार चौकशी
19
Ravi Pradosh 2024: कोर्ट कचेऱ्या आणि कौटुंबिक वादातून सुटका मिळावी म्हणून करा रवी प्रदोष व्रत!
20
केंब्रिजमधून M. Phil, राहण्यासाठी घर नाही, स्वत:ची कारही नाही, एवढी आहे राहुल गांधींची संपत्ती 

बेपत्ता मुलाचा सहा तासांत लागला शोध

By ऑनलाइन लोकमत | Published: October 16, 2018 6:03 AM

अपहरणकर्त्यास अटक; कासारवडवली पोलिसांची कामगिरी

- जितेंद्र कालेकर

ठाणे : घोडबंदर रोड येथून अपहरण झालेल्या एका तेरावर्षीय मुलाचा अवघ्या सहा ते सात तासांमध्ये कासारवडवली पोलिसांनी शोध घेऊन अपहरणकर्त्या देवानंद शर्मा (४५) याला सोमवारी पहाटेच्या सुमारास कल्याणच्या विठ्ठलवाडी भागातून अटक केली. त्याला दोन दिवस पोलीस कोठडी मिळाली आहे.

हा मुलगा रविवारी सकाळी घोडबंदर रोड येथील ‘जांगिड’ या इमारतीसमोरून सकाळी १० वाजण्याच्या सुमारास खेळताना अचानक बेपत्ता झाला. दोन तास उलटूनही तो घरी न परतल्याने त्याच्या पालकांनी सर्वत्र शोध घेतला. अखेर, रात्री कासारवडवली पोलीस ठाण्यात त्याच्या अपहरणाची तक्रार दाखल केली. तक्रार दाखल होत असतानाच त्याचा मोबाइल देवानंद शर्माकडे लागल्याचे आढळले. त्याला दोन तासांत घेऊन येतो, असे शर्माने सांगितले. तो न आल्याने अखेर वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्तात्रेय ढोले यांनी पथक तयार केले. त्यांनी विठ्ठलवाडी परिसरात रविवारी रात्री शोध घेतला. अनेक बांधकामांच्या ठिकाणी शोध घेतल्यानंतर एका बंद खोलीतून देवानंदला या पथकांनी ताब्यात घेतले. मुलाच्या मोबाइलच्या आधारावर विठ्ठलवाडी परिसरातून त्याची सुखरूप सुटका केल्याने पालकांनी आनंद व्यक्त केला.अशी घडली घटनादेवानंद हा पूर्वी ठाण्यातील ‘जांगिड’ इमारतीमध्ये सुरक्षारक्षक होता. सकाळी त्याने त्याला वाघबीळ येथे नेले. पण वाघबीळला जाण्याऐवजी बसने तो ठाणे रेल्वेस्थानक येथे गेला. तिथून रेल्वेने विठ्ठलवाडी गाठले. तेथील बांधकामाच्या ठिकाणी मुलाला त्याने एका खोलीत डांबून ठेवले. मुलाने घरी फोन केल्यानंतर दोन तासांत घेऊन येतो, असे त्याने सांगितले. पण नंतर देवानंदने स्वत:चाही फोन बंद करून ठेवला. घरी फोन केल्यास ठार मारण्याची धमकीही दिली.

टॅग्स :KidnappingअपहरणPoliceपोलिस