चाकण येथे अल्पवयीन शाळकरी मुलीवर बलात्कार, आरोपीस अटक
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 9, 2019 17:56 IST2019-02-09T17:55:43+5:302019-02-09T17:56:22+5:30
एका १७ वर्षीय अल्पवयीन शाळकरी मुलीचे अपहरण करुन जीवे मारण्याची धमकी देत एका २० वर्षीय तरुणाने तिच्यावर वारंवार बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

चाकण येथे अल्पवयीन शाळकरी मुलीवर बलात्कार, आरोपीस अटक
चाकण : चाकण परिसरातील एका १७ वर्षीय अल्पवयीन शाळकरी मुलीचे अपहरण करुन जीवे मारण्याची धमकी देत एका २० वर्षीय तरुणाने तिच्यावर वारंवार बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना एप्रिल २०१८ ते फेब्रुवारी २०१९ यादरम्यान चाकण जवळील खरपुडी ( ता.खेड ) येथील जंगलात घडली. याप्रकरणी पीडित मुलीने चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, नकुल ज्ञानेश्वर कदम ( वय २०, रा. जाचकवस्ती कडुस, ता. खेड ) या तरुणाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एप्रिल २०१८ ते फेब्रुवारी २०१९ या कालावधीत आरोपी नकुल कदम याने वेळोवेळी पीडित मुलीच्या शाळेजवळ जाऊन तिला जीवे मारण्याची धमकी दिली. तसेच तिला बळजबरीने त्याच्या स्कॉर्पिओ कारमध्ये बसवून खरपुडी येथील डोंगराच्या जवळील फ्लॉटमध्ये नेऊन तिच्यावर वारंवार बलात्कार केला. याप्रकरणी मुलीने चाकण पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार नकुल विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच त्याला अटक करण्यात आली आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील पवार यांच्या मार्गदर्शनाखाली चाकण पोलीस अधिक तपास करत आहेत.