नागपुरात  अल्पवयीन मुलीवर बलात्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 9, 2019 01:47 IST2019-11-08T23:17:20+5:302019-11-09T01:47:31+5:30

लग्नाचे आमिष दाखवून एका मित्राने हिंगण्यात नेऊन बलात्कार केल्याची तक्रार १६ वर्षीय मुलीने नोंदवली. विशेष म्हणजे, ज्याने दोनदा बलात्कार केला, त्याचे पूर्ण नावसुद्धा आपल्याला माहीत नसल्याचे मुलीने यशोधरानगर पोलिसांना दिलेल्या तक्रारीत नमूद केले आहे.

Minor girl raped in Nagpur | नागपुरात  अल्पवयीन मुलीवर बलात्कार

नागपुरात  अल्पवयीन मुलीवर बलात्कार

लोकमत  न्यूज  नेटवर्क
नागपूर : लग्नाचे आमिष दाखवून एका मित्राने हिंगण्यात नेऊन बलात्कार केल्याची तक्रार १६ वर्षीय मुलीने नोंदवली. विशेष म्हणजे, ज्याने दोनदा बलात्कार केला, त्याचे पूर्ण नावसुद्धा आपल्याला माहीत नसल्याचे मुलीने यशोधरानगर पोलिसांना दिलेल्या तक्रारीत नमूद केले आहे. योगेश नामक हा तरुण २२ वर्षांचा असून, तो निलडोह हिंगणा भागात राहतो, असे तरुणीने म्हटले आहे.
मुलगी यशोधरानगरात राहते. तिच्या घराच्या बाजुला गेल्या वर्षी टाईल्स फिटींगच्या कामासाठी तो आला होता. त्यावेळी त्याच्यासोबत मुलीची मैत्री झाली. त्याने आपले नाव योगेश असल्याचे सांगितले. त्यानंतर त्याने १ मार्च २०१८ ला त्याने तिला लग्नाचे आमिष दाखवून आपल्या घरी नेले. तेथे त्याने शरीरसंबंध जोडण्याचा प्रयत्न केला असता तिने विरोध केला. त्यावेळी आरोपीने बलात्कार केला. त्यानंतर ४ नोव्हेंबरला पुन्हा त्याने तरुणीला आपल्या घरी नेले आणि तिच्यावर बलात्कार केला. दरम्यान, मुलगी दिवसभर गायब असल्यामुळे आईवडिलांना संशय आला. त्यामुळे त्यांनी तिला विचारणा केली असता योगेशने त्याच्या घरी नेऊन बलात्कार केल्याचे आणि कुणाला माहिती दिल्यास मारेन, अशी धमकी दिल्याचे सांगितले. आईवडिलांनी तिला सरळ पोलीस ठाण्यात नेले. यशोधरानगर पोलिसांनी तिच्या तक्रारीवरून योगेशविरुद्ध पोक्सो कायद्यानुसार बलात्काराचा गुन्हा दाखल केला. पुढील तपास सुरू आहे.

Web Title: Minor girl raped in Nagpur