शहरं
Join us  
Trending Stories
1
...तर २८८ जागा लढवणार, ७ ते ८ उपमुख्यमंत्री करणार; मनोज जरांगे पाटलांचा फॉर्म्युला ठरला
2
"काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
3
सिंचन घोटाळ्याबाबत आम्ही अजित पवारांवर आरोप केले, कारण...; फडणवीस पहिल्यांदाच स्पष्टपणे बोलले!
4
रिपाईला एकही जागा मिळाली नाही, पण मला कॅबिनेट मिळणार - रामदास आठवले
5
Uddhav Thackeray : "भाजपा RSS लाही नकली संघ म्हणू शकतो; बंदीही घालू शकतो, 100 वे वर्ष धोक्याचे"
6
१५,२०,२५ आणि ३० वर्षांसाठी घ्यायचंय ३० लाखांचं Home Loan, किती द्यावा लागेल EMI, किती व्याज?
7
स्वाती मालिवाल मारहाण: विभव कुमार यांना मुख्यमंत्री निवासस्थानातून अटक, पोलीस ठाण्यात धक्काबुक्की
8
MI च्या शेवटच्या सामन्यानंतर कोच बाऊचर यांचा प्रश्न, पुढे काय? रोहित शर्मानं स्पष्ट सांगितलं
9
सोमवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार की नाही; BSE-NSE बंद राहणार का? जाणून घ्या
10
मोठी बातमी! MI च्या खराब कामगिरीनंतर सूत्र हलली; BCCI चा फैसला, रोहितलाही फटका
11
मंगळाचा रुचक राजयोग: ५ राशींना मंगलमय काळ, अधिक कमाईची संधी; उत्तम यश, प्रगती योग!
12
मराठी भाषेचा तिरस्कार करणाऱ्या 'त्याला' युवकांनी चांगलीच अद्दल घडवली, काय घडलं?
13
'महिलांचा आदर कसा करावा हे..'; हिजाब घातलेल्या मुलीला पाहून शाहरुखची थक्क करणारी रिॲक्शन
14
भाजपाचं 'अब की बार ४०० पार' कसं होणार?; विनोद तावडेंची भविष्यवाणी, गणित मांडलं
15
Rakhi Sawant : "मला खूप मजा करायचीय, माझ्यासाठी प्रार्थना करा..."; राखी सावंतचा सर्जरी आधीचा Video व्हायरल
16
मोहिनी एकादशी: शुभ योगांत ‘असे’ करा पूजन, मिळेल उत्तम फल; पाहा, मुहूर्त अन् काही मान्यता
17
Post Office Jansuraksha Scheme: कठीण काळात कुटुंबासाठी संकटमोचक बनतात 'या' ३ सरकारी स्कीम, पाहा याचे फायदे
18
Swati Maliwal : स्वाती मालीवाल यांचा आणखी एक Video आला समोर; 'त्या' दिवशी नेमकं काय घडलं?
19
"हिंदुत्व भेकडासारखं पळून जाऊन...", किरण मानेंनी सत्ताधाऱ्यांचा घेतला खरपूस समाचार
20
Gratuity Rules : खासगी नोकरीमध्ये ग्रॅच्युइटी मिळते का, त्याची गणना कशी होते माहितीये?

Video : जुहू परिसरात अल्पवयीन मुलीची बलात्कार करून हत्या; आरोपी अटकेत

By ऑनलाइन लोकमत | Published: April 06, 2019 3:12 PM

आरोपीला ताब्यात देण्याची मागणी करत संतप्त नागरिकांनी पोलीस ठाण्याबाहेर गर्दी केली आहे. 

ठळक मुद्देया घटनेबाबत जुहू पोलिसांनी देवेंद्र वड्डी (३५) याला अटक केली आहे. आरोपी वड्डी हा याच परिसरात राहणारा असून त्याच्यावर अगोदर देखील काही गुन्हे दाखल आहेत. तिच्यावर बलात्कार झाल्याचं वैद्यकीय तपासणीनंतर निष्पन्न झालं.

मुंबई - जुहू परिसरातील सार्वजनिक शौचालयात ९ वर्षाच्या मुलीवर बलात्कार करून तिची हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेबाबत जुहू पोलिसांनी देवेंद्र वड्डी (३५) याला अटक केली आहे.

गेल्या २ दिवसांपासून मृत मुलगी बेपत्ता होती. तिचा शोध सुरू असताना आज ती एका सार्वजनिक शौचालयात मृतावस्थेत आढळली. तिच्यावर बलात्कार झाल्याचं वैद्यकीय तपासणीनंतर निष्पन्न झालं. त्यानंतर पोलीस तपासात देवेंद्र वड्डी याच्या चौकशीत पोलिसी खाक्या दाखविल्यानंतर गुन्हा उघड झाला. आरोपी वड्डी हा याच परिसरात राहणारा असून त्याच्यावर अगोदर देखील काही गुन्हे दाखल आहेत. पोलिसांनी आरोपीला अटक केली असली तरी या भागात प्रचंड तणाव आणि खळबळ माजलेली आहे. आरोपीला ताब्यात देण्याची मागणी करत संतप्त नागरिकांनी पोलीस ठाण्याबाहेर गर्दी केली आहे. भा.दं.वि. कलम 302, 376, 201 सह पॉक्सो कायदा 4, 8, 12 अन्वये आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

टॅग्स :Rapeबलात्कारMurderखूनArrestअटकPOCSO Actपॉक्सो कायदाPoliceपोलिस