शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
2
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
3
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
4
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
5
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
6
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
7
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
8
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
9
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
10
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
11
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
12
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
13
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
14
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
15
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
16
ड्रग्जमाफियांनी पोखरली मुंबई विमानतळाची सुरक्षा; ड्रग्जचे पार्सल करायचे क्लिअर : कस्टम अधीक्षकासह दोन पोलिसांना अटक
17
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
18
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
19
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
20
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  

अल्पवयीन मुलीवरील अत्याचाराने नगर जिल्हा हादरला, उपराचाराआधीच पीडितेचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 1, 2018 18:56 IST

अल्पवयीन मुलीवर झालेल्या बलात्कारामुळे अहमदनगर पुन्हा हादरले आहे. पीडित मुलीचा उपचाराअाधीच मृत्यू झाल्याने परिसरात तणाव निर्माण झाला आहे.

अहमदनगर - श्रीरामपूर तालुक्यातील कारेगाव येथील पाच वर्षे वयाच्या मुलीच्या मृत्यूनंतर श्रीरामपूरमध्ये कार्यकर्त्यांनी साखर कामगार रुग्णालयाबाहेर मोठी गर्दी केली आहे. मुलीवर अत्याचार झाल्यामुळे मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज डॉक्टरांनी तपासणीनंतर व्यक्त केला आहे. न्यायवैद्यक अहवाल आल्यानंतरच ही बाब स्पष्ट होणार आहे. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेता वरिष्ठ पोलीस अधिकारी घटनास्थळी रवाना झाले आहेत.कारेगाव येथे शनिवारी दुपारी 12 वाजेच्या दरम्यान ही घटना घडली. गावातील गरीब मागासवर्गीय समाजातील अंगणवाडीत शिकणारी ही मुलगी आहे. तिचे आई व वडील दोघेही मजुरी करतात.  शनिवारी सकाळीच दोघेही कामावर गेले होते. आजीसह दोन वर्षे वयाने मोठी असलेल्या आपल्या बहिणीबरोबर  मुलगी घरी होती. शौचालयाला बहिणीसोबत बाहेर गेलेली मुलगी घरी परतली असता तिला चक्कर आली. स्थानिक डॉक्टरांनी तपासल्यानंतर तिला श्रीरामपूरला नेण्यात आले. तेथे प्राथमिक तपासणीनंतर तिच्यावर अत्याचार झाल्याचा प्राथमिक अंदाज डॉक्टर रवींद्र जगधने यांनी वर्तविला आहे. न्यायवैद्यक तापसणीकरिता मृतदेह औरंगाबाद अथवा प्रवरा रुग्णालयात नेण्याचे सुचविले आहे, असे डॉ. रवींद्र जगधने यांनी सांगितलेदरम्यान, घटनेचे गांभीर्य लक्षात घेता वरिष्ठ पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल होत आहेत. आरोपीच्या शोधासाठी तीन पथके रवाना करण्यात आली आहेत. मुलीवर अत्याचार झाल्याचा अंदाज आहे. डॉक्टरांशी आपण चर्चा केली आहे. असे असले तरी न्याय वैद्यक अहवालानंतर ते स्पष्ट होईल, असे पोलीस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांनी लोकमतशी बोलताना सांगितले. मृतदेह घाटी रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. घटनेची वार्ता पसरताच कार्यकर्त्यांनी रुग्णालयाबाहेर मोठी गर्दी केली होती.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीAhmednagarअहमदनगरRapeबलात्कारMaharashtraमहाराष्ट्र