अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्याला अटक, २५ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी
By सुनील पाटील | Updated: August 20, 2022 19:16 IST2022-08-20T19:15:22+5:302022-08-20T19:16:38+5:30
धरणगाव तालुक्यातील एका गावातून पीडित बालिकेला ३ ऑगस्टरोजी समाधान याने पळून नेले होते.

अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्याला अटक, २५ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी
जळगाव- १४ वर्षीय मुलीला पळून नेऊन तिच्यावर अत्याचार करणाऱ्या समाधान उर्फ गणेश पांडूरंग वाघ (वय २३,रा.वाघाडी बु.ता.शिंदखेडा, जि.धुळे) याला पाळधी पोलिसांनी अटक केली आहे. शनिवारी न्यायालयात हजर केले असता त्याला २५ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
धरणगाव तालुक्यातील एका गावातून पीडित बालिकेला ३ ऑगस्टरोजी समाधान याने पळून नेले होते. याप्रकरणी ५ ऑगस्ट रोजी धरणगाव पोलिसात अपहरणाचा गुन्हा दाखल झाला होता. १९ ऑगस्ट रोजी रात्री समाधान याला अटक करण्यात आली. पीडितेची वैद्यकिय तपासणी व जबाबावरून या गुन्ह्यात बलात्काराचे कलम वाढविण्यात आले.
तपासाधिकारी सहायक पोलीस निरीक्षक गणेश बुवा यांनी शनिवारी संशयिताला न्यायालयात हजर केले असता २५ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. सरकारतर्फे ॲड. प्रदीप महाजन यांनी काम पाहिले. समाधान याने पीडितेला लग्नाचे आमिष दाखवून पळवून नेल्याचे उघड झाले.