नात्याला काळिमा! अल्पवयीन मुलगी बनली आई, भावावर गुन्हा
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 12, 2019 19:26 IST2019-11-12T19:21:55+5:302019-11-12T19:26:23+5:30
उल्हासनगरमधील धक्कादायक घटना

नात्याला काळिमा! अल्पवयीन मुलगी बनली आई, भावावर गुन्हा
उल्हासनगर - शहारातील आशेळेगावात बहीण भावाच्या नात्याला काळीमा लागणारी घटना घडली आहे. सावत्र बहिणीला आई बनविणाऱ्या भावाविरोधात विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून न्यायालयाने तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
उल्हासनगर शेजारील आशेळे गावात अल्पवयीन मुलगी आई , वडील व सावत्र भावासोबत राहत होती. काही दिवसांपूर्वी आई व वडील भिवंडी येथे मोलमजुरीचे काम करण्यासाठी गेल्यावर अल्पवयीन मुलगी सावत्र भावा सोबत घरी राहत होती. 26 वर्षाच्या भावाचे लग्न झाले असून त्याची पत्नी काही कारणास्तव माहेरी गेली. या दरम्यान अल्पवयीन बहिणीवर अत्याचार केल्याने अल्पवयीन मुलीने एका मुलीला जन्म दिला. त्या दरम्यान मुलीची आई घरी आल्यानंतर लहान बाळ घरात दिसले. याबाबत विचारणा करण्यात आल्यावर, सावत्र भावाने मुलगा मुंबईला सापडल्याचे सांगितले. तसेच बाळाचा संभाळ करण्याचे सांगून त्याच्या संगोपनासाठी जळगाव येथे आजी-आजोबा यांच्याकडे पाठविले.
जळगाव जिल्ह्यातील एका गावात लहान मुलांची चर्चा होऊन गावच्या पोलीस पाटील यांनी सदर माहिती स्थानिक पोलिसांनी दिली. पोलिसांनी याबाबत चौकशी केल्यावर खरा प्रकार उघड होऊन सावत्र भावाविरोधात गुन्हा दाखल केला. पुढील चौकशीसाठी गुन्हा विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात वर्ग करण्यात येऊन पोलिसांनी सावत्र भावाला अटक केली. न्यायालयाने आरोपीला 3 दिवसाची पोलीस कस्टडी देण्यात आली असून अल्पवयीन मुलीवर शहरातील मध्यवर्ती रुग्णालयात उपचार सुरू आहे. तर तिच्या मुलीवर जळगाव येथे उपचार सुरू असल्याची माहिती विठ्ठलवाडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रमेश भामे यांनी दिली आहे.