अकोल्यातील अल्पवयीन मुलीवर औरंगाबादमधील दोघांचा बलात्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2018 18:12 IST2018-09-08T18:09:56+5:302018-09-08T18:12:39+5:30

अकोला : अकोल्यातील सिव्हिल लाइन्स पोलीस ठाण्याच्या हद्दीतील रहिवासी असलेल्या एका १७ वर्षीय अल्पवयीन मुलीवर औरंगाबाद येथील दोघांनी औरंगाबाद शहरातच बलात्कार केल्याची घटना शनिवारी उघडकीस आली.

a minor girl in from akola raped in Aurangabad | अकोल्यातील अल्पवयीन मुलीवर औरंगाबादमधील दोघांचा बलात्कार

अकोल्यातील अल्पवयीन मुलीवर औरंगाबादमधील दोघांचा बलात्कार

ठळक मुद्देऔरंगाबादला गेली असता, तिची ओळख औरंगाबादच्या कामगार चौकातील रहिवासी दत्ता चिंचोले सोबत झाली. त्यानंतर दत्ता चिंचोलेने त्याचा मित्र राजू सोबत या मुलीची ओळख करून दिली. या दोघांनी अल्पवयीन मुलीला हे छायाचित्र पाठवून शारीरिक संबंध ठेवण्यास बाध्य केले.

अकोला : अकोल्यातील सिव्हिल लाइन्स पोलीस ठाण्याच्या हद्दीतील रहिवासी असलेल्या एका १७ वर्षीय अल्पवयीन मुलीवर औरंगाबाद येथील दोघांनी औरंगाबाद शहरातच बलात्कार केल्याची घटना शनिवारी उघडकीस आली. या प्रकरणात सिव्हिल लाइन्स पोलिसांनी गुन्हा दाखल करून, प्रकरण औरंगाबाद पोलिसांकडे वर्ग केले आहे.
सिव्हिल लाइन पोलीस ठाण्याच्या हद्दीतील रहिवासी १७ वर्षीय मुलगी औरंगाबादला गेली असता, तिची ओळख औरंगाबादच्या कामगार चौकातील रहिवासी दत्ता चिंचोले सोबत झाली. त्यानंतर दत्ता चिंचोलेने त्याचा मित्र राजू सोबत या मुलीची ओळख करून दिली. त्यानंतर ओळखीचे मैत्रीत रूपांतर होताच, या दोघांनी तिला औरंगाबाद शहराबाहेर असलेल्या राष्ट्रीय महामार्गावर आणले. तिथे अल्पवयीन मुलीसोबत दत्ता व त्याचा मित्र राजू या दोघांनी छायाचित्र काढले. एकमेकांच्या गळ्यात हात टाकून तसेच आक्षेपार्ह छायाचित्र काढल्यानंतर या दोघांनी अल्पवयीन मुलीला हे छायाचित्र पाठवून शारीरिक संबंध ठेवण्यास बाध्य केले. २६ जून ते ७ सप्टेंबर या दोन ते तीन महिन्यांच्या कालावधीत या दोघांनी मुलीचे शारीरिक शोषण सुरूच ठेवले. मात्र, मुलगी अकोल्यात परतल्यानंतरही या दोघांनी तिला शारीरिक संबंध ठेवण्यासाठी त्रास दिल्याने या त्रासाला कंटाळून अल्पवयीन मुलीने दत्ता चिंचोले व त्याचा मित्र राजू या दोघांविरोधात बलात्कार, विनयभंग, पोक्सो व अ‍ॅट्रॉसिटी कायद्यानुसार सिव्हिल लाइन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यासाठी तक्रार दिली. यावरून सिव्हिल लाइन्स पोलिसांनी या दोघांविरोधात गुन्हा दाखल केला. त्यानंतर घटनास्थळ व प्रकरण औरंगाबाद शहरात घडल्याने सिव्हिल लाइन्स पोलिसांनी हे प्रकरण औरंगाबाद पोलिसांकडे पाठविले आहे.

 

Web Title: a minor girl in from akola raped in Aurangabad