पनवेलमध्ये एका अल्पवयीन दिव्यांग मुलीवर बलात्कार

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 3, 2020 22:34 IST2020-03-03T22:32:50+5:302020-03-03T22:34:39+5:30

१७ वर्षीय मतिमंद मुलीवर दोघांनी मतिमंद असल्याचा फायदा घेत बलात्कार केल्याची घटना समोर आली आहे. 

A minor divyang girl raped in Panvel pda | पनवेलमध्ये एका अल्पवयीन दिव्यांग मुलीवर बलात्कार

पनवेलमध्ये एका अल्पवयीन दिव्यांग मुलीवर बलात्कार

ठळक मुद्देशारीरिक तपासणी करताना पीडित मतिमंद तरूणी ही एका आठवड्याची गरोदर असल्याचे समोर आले आहे.पीडित मुलीला एकाने गाडीवरून गावात नेले आणि दुसऱ्या मुलाने तिच्यावर लैंगिक अत्याचार केला.

पनवेल - एका अल्पवयीन आणि मतिमंद मुलीवर अत्याचार करण्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी पनवेल तालुका पोलीस ठाण्यात दोघांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पनवेल तालुक्यातील एका गावात राहणाऱ्या १७ वर्षीय मतिमंद मुलीवर दोघांनी मतिमंद असल्याचा फायदा घेत बलात्कार केल्याची घटना समोर आली आहे. 

शारीरिक तपासणी करताना पीडित मतिमंद तरूणी ही एका आठवड्याची गरोदर असल्याचे समोर आले आहे. पीडित अल्पवयीन तरुणीच्या आईने थेट पनवेल तालुका पोलीस ठाणे गाठले आणि या प्रकरणाची माहिती पोलिसांना दिली. याप्रकरणी पनवेल तालुका पोलिसांनी सुमित जुमारे( २२) आणि ओमकार दरेकर(२४) या दोघांना अटक केले असून या दोघांवरही पॉक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असल्याचे पोलीस उपनिरीक्षक योगिता कुदळे यांनी माहिती दिली. कुदळे यांनी सांगितले की, पीडित मुलीला एकाने गाडीवरून गावात नेले आणि दुसऱ्या मुलाने तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. ही अतिशय संवेदनशील घटना असल्याने बारकाईने तपास केला जात आहे. पीडित अल्पवयीन मुलगी १ महिन्याची गरोदर राहिली आहे. 

Web Title: A minor divyang girl raped in Panvel pda