#MeToo : वसईतील डॉक्टरवर बलात्काराचा गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 22, 2018 20:48 IST2018-11-22T20:45:44+5:302018-11-22T20:48:20+5:30
तक्रारदार तरूणी २२ वर्षांची असून वैद्यकीय महाविद्यालयात प्रथम वर्ष एमबीबीएसचे शिक्षण घेत आहे. मागच्या वर्षी ती या डॉक्टरकडे प्रशिक्षणासाठी गेली होती. त्यादरम्यान यांची ओळख झाली. शिकवण्याच्या बहाण्याने डॉक्टरने या डॉक्टरने तीन वेळा बलात्कार केल्याची तक्रार पिडित तरूणीने केली आहे.

#MeToo : वसईतील डॉक्टरवर बलात्काराचा गुन्हा दाखल
वसई - MeToo प्रकऱणात वसईत एका प्रसिद्ध डॉक्टराविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या डॉक्टरकडे आलेल्या वैद्यकीय महाविद्यालयात शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थींनीने ही तक्रार दाखल केली आहे.
तक्रारदार तरूणी २२ वर्षांची असून वैद्यकीय महाविद्यालयात प्रथम वर्ष एमबीबीएसचे शिक्षण घेत आहे. मागच्या वर्षी ती या डॉक्टरकडे प्रशिक्षणासाठी गेली होती. त्यादरम्यान यांची ओळख झाली. शिकवण्याच्या बहाण्याने डॉक्टरने या डॉक्टरने तीन वेळा बलात्कार केल्याची तक्रार पिडित तरूणीने केली आहे. या डॉक्टरची जव्हार येथे बदली झाल्यानंतर तेथे या तरूणीला बोलावले होते आणि तिथेही बलात्कार केला होता असे तिने तक्रारीत म्हटले आहे. तिने जव्हार पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर त्या पोलीस ठाण्यात ३५ वर्षीय डॉक्टरच्या विरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल कऱण्यात आला होता. आता तो गुन्हा माणिकपूर पोलीस ठाण्यात वर्ग करण्यात आला आहे. हा डॉक्टर एका धर्मदाय संस्थेच्या रुग्णालयात असताना पहिली बलात्काराती घटना घडली होती तर दुसरी घटना वसईतील एका खाजगी रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात घडली अशी तक्रार या तरुणीने दिली होती असल्याचे आमच्याकडे हा गुन्हा वर्ग करण्यात आल्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला आहे. वसईत दोन ठिकाणी या तरूणीने बलात्कार झाल्याची तक्रार दिल्याची माहिती माणिकपूर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दामोदर बांदेकर यांनी दिली. MeToo प्रकरण चर्चेत आल्यानंतर या तरूणीने तक्रार देण्याचा निर्णय़ घेतला असे पोलिसांनी सांगितले.