रेल्वेत महिलांच्या डब्यात पुरूषाचे अश्लिल चाळे, व्हिडीओ व्हायरल; पोलिसांनी घेतली दखल
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 9, 2021 19:14 IST2021-11-09T18:32:34+5:302021-11-09T19:14:12+5:30
Men's masturbating in women's coaches on Local train : पुरुषाचा भरदिवसा अश्लील चाळे करतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडिओवर रेल्वे प्रवाशांच्या संतप्त प्रतिक्रिया उमटत असून लोकलमधील महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

रेल्वेत महिलांच्या डब्यात पुरूषाचे अश्लिल चाळे, व्हिडीओ व्हायरल; पोलिसांनी घेतली दखल
मुंबई - रेल्वेत एका लोकलमध्ये एका पुरुषाचा भरदिवसा अश्लील चाळे करतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
या व्हिडिओवर रेल्वे प्रवाशांच्या संतप्त प्रतिक्रिया उमटत असून लोकलमधीलमहिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
या विकृतावर कारवाई करण्याची मागणी होत आहे. हा व्हिडिओ नक्की कधी चित्रीत झाला आहे, हे मात्र अजून स्पष्ट झालेले नाही. व्हिडिओमध्ये पाहून हा व्हिडीओ सध्याचा असल्याचे कळत आहे. कारण या व्हिडिओमध्ये अनेक महिलांच्या चेहऱ्यावर मास्क दिसत आहे.
या व्हिडिओत अश्लील चाळे करणारा हा पुरूष लोकलच्या दाराजवळ उभा आहे. पुरुष हस्तमैथुन करताना दिसत आहे आणि महिला घाबरलेल्या असल्याचं स्पष्ट व्हिडिओमध्ये दिसत आहे. महिला त्याला विरोध करत आहेत. मात्र, तो त्या विरोधाला न जुमानता हस्तमैथुन करणं थांबवले नाही. विकृताच्या चेहऱ्यावर आपण काही चुकीचे करत असल्याचा कोणताच भावही दिसत नव्हता. २१ सेकंंदाचा हा व्हिडिओ आता सर्वत्र व्हायरल झाला आहे. दरम्यान, रेल्वे पोलिसांनीही या व्हिडिओची दखल घेतली आहे. आम्ही आरोपींचा तपास करत असून लवकरच त्यांना अटक करू, आम्ही त्यांच्यावर कारवाई करू असं आश्वासन रेल्वे पोलिसांनी दिले आहे.