शहरं
Join us  
Trending Stories
1
तुम्हाला राजकारणात मुलं होत नाही, त्यात आमचा दोष काय?; उद्धव ठाकरेंचा घणाघात
2
रिकामे झाले, दुसरीकडे काम, भाजपचा फॉर्म्युला; अनेक नेत्यांना दुसऱ्या मतदारसंघात पाठवले
3
आरक्षणाची मर्यादा ७३ टक्के करणार, शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ; राहुल गांधी यांची पुण्यातील सभेत घोषणा
4
PPF Vs NPS: रिटायरमेंटसाठी कोणता प्लान ठरेल बेस्ट? 'हे' आहेत पीपीएफ आणि एनपीएसचे फायदे
5
एकनाथ खडसेंच्या प्रवेशाला विरोध कशाला असेल ? वार्तालापात विनाेद तावडे यांनी मांडली भूमिका
6
Wipro चे संस्थापक अझीम प्रेमजी बँकिंग क्षेत्रात उतरणार; 'या' बँकेतील हिस्सा खरेदी करण्याच्या तयारीत
7
पहिल्या भाषणानंतर बाळासाहेबांनी दिलेला 'तो' सल्ला राज ठाकरेंनी कायम लक्षात ठेवला
8
अमेठीत २५ वर्षांत प्रथमच मैदानात नसेल गांधी घराणे; बालेकिल्ल्यातून काॅंग्रेसने उमेदवार बदलला, भाजप नेत्यांचे टीकास्त्र
9
उद्धव यांच्या आजारपणात मोदी करायचे विचारपूस ; पंतप्रधानांच्या विधानावर राजकीय टोलेबाजी सुरू
10
खासदारांना डावलून आमदार रिंगणात, नव्या चेहऱ्यांमुळे चुरस; रणनीती ठरणार का यशस्वी?
11
सरकारने सर्वसामान्यांचे जगणे मुश्कील केले; आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल
12
आजचे राशीभविष्य - ४ मे २०२४; आज आपणास खूप मोठा आर्थिक लाभ होईल
13
रावसाहेब दानवे षटकार मारणार ? जालन्यात चुरशीची लढाई, भाजपचा वरचष्मा; मविआ कमकुवत!
14
तिकीट तर कापले, आता पुनर्वसनाचा प्रश्न, महायुतीने १२ विद्यमान खासदारांना बसवले घरी
15
शेतकरी संकटात असताना केंद्राकडून सत्तेचा गैरवापर सुरू ; शरद पवार यांची टीका
16
जादूटोण्याच्या संशयातून दोघांना जिवंत जाळले; घरात मृत्युसत्र, १५ जणांना अटक
17
मुंबईत मराठी टक्का कोणाच्या फायद्याचा? मराठी मते आपल्याच झोळीत पाडून घेण्यासाठी घमासान रंगणार
18
भाजपने १२ केंद्रीय मंत्र्यांना तिकीट नाकारले; निकालावर ११ केंद्रीय मंत्र्यांचे भवितव्य ठरणार
19
ॲड. उज्ज्वल निकम २८ कोटींचे मालक; एक कार, अंधेरी, जळगाव आणि दहिसर येथे घरे
20
आता ‘त्या’ महिलेच्या अपहरणाचाही गुन्हा दाखल; पाच दिवसांपासून बेपत्ता असल्याची तक्रार दाखल

मेहुल ठाकूर, मदन गोपाळ चतुर्वेदीला ईडीकडून अटक; सात ठिकाणी जप्तीची कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Published: January 24, 2021 2:02 AM

विवा समूह, पीएमसी बँक घोटाळा प्रकरण - विवा समूहाशी संबंधित छापे टाकलेल्या विविध सात ठिकाणी जप्तीची कारवाई रात्रीपर्यंत सुरू होती

मुंबई / नालासोपारा : विवा समूहाचे व्यवस्थापकीय संचालक मेहुल ठाकूर व मदन गोपाळ चतुर्वेदी यांना शनिवारी सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) अटक केली. २७ जानेवारीपर्यंत त्यांना ईडीची कोठडी सुनावण्यात आली आहे. या समूहाचे पीएमसी बँक घोटाळ्याप्रकरणी जवळपास नऊ तास कसून चौकशी केल्यावर ही कारवाई करण्यात आली. बहुजन विकास आघाडीचे अध्यक्ष आमदार हितेंद्र ठाकूर यांच्यासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.

विवा समूहाशी संबंधित छापे टाकलेल्या विविध सात ठिकाणी जप्तीची कारवाई रात्रीपर्यंत सुरू होती. आतापर्यंत तेथून ७३ लाखांच्या रोकडीसह आर्थिक व्यवहारासंबधी कागदपत्रे, लॅपटॉप, मोबाइल आदी डिजिटल साहित्य मोठ्या प्रमाणात जप्त करण्यात आल्याचे सांगण्यात आले. पीएमसी बँक घोटाळ्याप्रकरणी मनी लाँड्रिंगबाबत गुन्हा दाखल असलेल्या प्रवीण राऊत यांचा व्हिवा कंपनीशी संबंध असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर ते ईडीच्या रडारवर होते. त्याबाबत सर्व तयारी झाल्यानंतर वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली स्वतंत्र पथकांनी शुक्रवारी सकाळपासून छापे सत्रे सुरू केले. त्यामध्ये विरारमधील विवाच्या मुख्य कार्यालय, अंधेरी, जुहू व चेंबूर येथील कार्यालय, तसेच कंपनीशी संबंधित आर्थिक सल्लागाराच्या निवासस्थानी समावेश होता. 

या ठिकाणाहून मोठ्या प्रमाणात कंपनीचे आर्थिक व्यवहार, गुंतवणूक, देवाण-घेवाणसंबंधी दस्तऐवज मोठ्या प्रमाणात जप्त केला आहे. त्यामध्ये कॉम्प्युटर, लॅपटॉप आदी डिजिटल वस्तूचा समावेश आहे.  कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक मेहुल ठाकूर, कंपनीचे आर्थिकव्यवहार हाताळणारे संचालक मदन चतुर्वेदी यांना ताब्यात घेऊन ईडीच्या बेलार्ड पियार्ड येथील कार्यालयात आणण्यात आले. त्याच्याकडे जवळपास नऊ तास चौकशी करण्यात आली. त्यांच्याकडून समाधानकारक खुलासा होऊ न शकल्याने शनिवारी सकाळी त्यांना अटक करण्यात आली. कंपनीच्या कार्यालयात जप्तीची कारवाई सुरू होती. पीएमसी बँकेच्या अनियमित कर्जातून शेकडो कोटींच्या घोटाळ्याबाबत राकेश वाधवान व कुटुंबीयांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आले. त्यानंतर या प्रकरणाशी सबधितांवर कारवाई करण्यात येत आहे. 

टॅग्स :Enforcement Directorateअंमलबजावणी संचालनालय