शहरं
Join us  
Trending Stories
1
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
2
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
3
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
4
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
5
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
6
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
7
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
8
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
9
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
10
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
11
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
12
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया
13
पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवशी राहुल गांधींने पाठवले 'विशेष' पत्र; केली एक खास मागणी
14
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
15
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर
16
ह्युंदाईच्या या SUV ची किंमत ₹6 लाखही नव्हती, नव्या GST नंतर ₹86156 नं स्वस्त झाली; वरून ₹50000 चा डिस्काउंटही!
17
"क्लेमोर, वायर, पावडर... सगळं तयार होतं !" गुप्त माहितीने गडचिरोली पोलिसांनी रोखला भीषण कट
18
पाक आशिया कप स्पर्धेतून Out? सामान बसमध्ये अन् पाक खेळाडू हॉटेलमध्ये! नेमकं काय घडलं?
19
वाघाला घोरताना कधी पाहिलंय? VIDEO पाहून नेटकरी म्हणतायत, "हे तर आमच्या बाबांसारखेच..."

सीबीआय आणि एम्सच्या डॉक्टरांची बैठक तूर्तास टळली, अहवालाची करावी लागणार प्रतीक्षा 

By पूनम अपराज | Updated: September 22, 2020 21:04 IST

Sushant Singh Rajput Case : बैठक पुढे ढकलण्यामागील कारणांबद्दल सध्या कोणतीही माहिती नाही. एम्सची फॉरेन्सिक टीम सुशांत सिंग प्रकरणाच्या वैद्यकीय बाबी तपासण्यात गुंतली आहे.

ठळक मुद्देअलीकडेच एक माहिती समोर आली की, एम्सच्या फॉरेन्सिक टीमने अभिनेत्याची व्हिसेरा तपासणी करण्याचा निर्णय घेतला आहे, ज्याचा अहवाल दहा दिवसांत येईल. 

बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंग राजपूत यांच्या मृत्यूचे रहस्य दिवसेंदिवस वाढत आहे. दरम्यान, सीबीआय आणि एम्स रुग्णालयाचे पथक या प्रकरणाची सातत्याने चौकशी करत आहेत. तथापि, सुशांत सिंग राजपूतचा मृत्यूआत्महत्या की हत्या याचा अद्याप खुलासा झालेला नाही. सीबीआयची टीम या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी सातत्याने तपास करत आहे. दरम्यान, आज सीबीआय आणि एम्स टीम यांच्यात महत्वाची होणारी बैठक अखेर टळली आहे. या बैठकीत दोन्ही टीम सुशांत सिंग राजपूत यांच्या मृत्यूशी संबंधित तपासणीच्या तपशीलांवर चर्चा करण्यात येणार होती. तीन एजन्सी सुशांत सिंग राजपूत मृत्यूच्या चौकशीत आहेत. या प्रकरणाच्या वैद्यकीय बाबींची चौकशी करणाऱ्या एम्सची फॉरेन्सिक टीम आणि अभिनेताच्या मृत्यूचे कारण शोधण्यात गुंतलेली केंद्रीय अन्वेषण यंत्रणा (सीबीआय) मंगळवारी भेटणार होती. मात्र, आता ही बैठक तहकूब करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे.बैठक पुढे ढकलण्यामागील कारणांबद्दल सध्या कोणतीही माहिती नाही. एम्सची फॉरेन्सिक टीम सुशांत सिंग प्रकरणाच्या वैद्यकीय बाबी तपासण्यात गुंतली आहे. त्या त्याच्या मृत्यूमागील विष हेच कारण आहे की नाही हे शोधण्याचा तपासाचे उद्दिष्ट आहे. अलीकडेच एक माहिती समोर आली की, एम्सच्या फॉरेन्सिक टीमने अभिनेत्याची व्हिसेरा तपासणी करण्याचा निर्णय घेतला आहे, ज्याचा अहवाल दहा दिवसांत येईल, बॉलिवूडलाईफ डॉट कॉमने अशी माहिती दिली आहे.  सीबीआयच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ऑल इंडिया इंस्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस (एम्स) ची फॉरेन्सिक टीम दक्षिण दिल्लीतील लोधी रोड भागात मुख्यालयात सीबीआयच्या विशेष तपास पथकाच्या (एसआयटी) टीम सदस्यांची भेट घेणार होती. सूत्रांनी सांगितले की, सीबीआय आणि सीएफएसएलच्या एसआयटी अहवालाचा अभ्यास केल्यानंतर सुशांत सिंग राजपूत यांच्या मृत्यू प्रकरणात काही तथ्य लपलेले आहे की नाही याबाबत एम्स मेडिकल बोर्ड अंतिम निर्णय घेणार होती. सूत्रांनी सांगितले की, सीबीआय आपले तपास तपशील एम्सच्या फॉरेन्सिक टीमसमवेतही सांगेल आणि त्यानंतर पुढील कारवाईचा निर्णय घेणार असल्याची माहिती जागरणने दिली होती. मात्र आजची बैठक पुढे ढकलण्यात आल्याने अहवालाची अजून काही दिवस प्रतीक्षा करावी लागणार आहे. 

 

अन्य महत्वाच्या बातम्या...

 

सुशांतच्या मृत्यूचे गूढ उकलण्याची शक्यता, सीबीआय आणि एम्सच्या टीमची उद्या महत्वपूर्ण बैठक 

 

फेलिक्स दहाल हत्या प्रकरण सीबीआयकडेही प्रलंबितच, आईकडून चिंता व्यक्त 

 

Sushant Singh Rajput Case : 'क्या तुम्हारे पास माल है?' उघड झाले नवे ड्रग चॅट, टॉप सेलिब्रेटींचा समावेश

 

नवीन पोलीस अधिक्षक डॉ. प्रविण मुंढे यांनी स्वीकारला पदभार

 

ठरलं! मुंबई पोलिसांवर टीका करणारे बिहारचे डीजीपी गुप्तेश्वर पांडे विधानसभेची निवडणूक लढवणार

 

दुकानाच्या काउंटरवर ऐकू आला बालिकेच्या रडण्याचा आवाज अन् उघडकीस आली घृणास्पद घटना 

 

जया साहा हिच्यावर अटकेची टांगती तलवार, NCB कडून सलग दुसऱ्यादिवशी कसून चौकशी

टॅग्स :Sushant Singh Rajputसुशांत सिंग रजपूतDeathमृत्यूSuicideआत्महत्याCBIगुन्हा अन्वेषण विभागhospitalहॉस्पिटल